६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनास आयोजन समिती सज्ज •१६, १७, १८ डिसेंबर २०२२ रोजी तीन दिवसीय ६८ वे विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन

६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनास आयोजन समिती सज्ज

•१६, १७, १८ डिसेंबर २०२२ रोजी तीन दिवसीय ६८ वे विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन

६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनास आयोजन समिती सज्ज •१६, १७, १८ डिसेंबर २०२२ रोजी तीन दिवसीय ६८ वे विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 14 डिसेंबर
चंद्रपूर येथे होणाऱ्या ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे नियोजन जवळपास पुर्ण झाले आहे. विविध समिती कामांचा आढावा शेवटच्या बैठकीत घेण्यात आला. यात ग्रंथ दिंडी, मंच व्यवस्था, उद्घाटन, प्रवास, निवास, भोजन समिती या सर्व समितींच्या कामांचा आढावा विविध समिती प्रमुखांकडून व समिती सदस्यांकडून शेवटच्या बैठकीत घेण्यात आला. चंद्रपूरात होणाऱ्या ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनास आयोजन समिती सज्ज आहे असे या बैठकीत संमेलन कार्याध्यक्ष व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी सांगितले. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार करतील. यावेळी ६७ वे विदर्भ साहित्य संमेलनाचे पुर्वाध्यक्ष डॉ. म.रा. जोशी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. फिरदौस मिर्जा प्रामुख्याने उपस्थित राहतील. या आढावा बैठकीत संमेलन कार्याध्यक्ष व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी डॉ. श्याम मोहरकर, सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव प्रदीप देशमुख, संजय वैद्य, विवेक पत्तिवार , गीता देव्हारे – रायपूरे, सुनिल बावणे, सुमेधा श्रीरामे, सुरेश गारघाटे , स्वप्नील मेश्राम व संमेलन समितीतील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here