ना. म. जोशी विद्याभवन गोरेगांव मधील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत निवड
✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞संपर्क-७०२११५८४६०📞
माणगांव :-रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी कळंबोली पनवेल येथे संपन्न झालेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेमध्ये १८ वर्षाखालील गटात गोरेगांव खो-खो क्लब या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून संघातील कुमार धीरज भोईर याची सर्वोत्कृष्ट संरक्षक व कुमार गितेश बामणोलकर याची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तसेच आपल्या संघातील कुमार धीरज भोईर, गितेश बामणोलकर, किरण गोरेगावकर, देवांश घरत व भावेश गोविलकर यांची रायगड जिल्हा संघात निवड झाली आहे.
याच बरोबर १८ वर्षाखालील महिला गटात ना. म. जोशी शाळेचे संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाले असून संघातील विभा आदेश सुतार हिची सर्वोत्कृष्ट आक्रमक तर शरयू अंतोष हासे हिची स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तसेच आपल्या संघातील कुमारी शरयू हासे, विभाग सुतार, शर्वरी टेंबे व उपासना शिगवण यांची रायगड जिल्हा संघात निवड झाली आहे.