कृष्णा डायग्नोस्टिक लि. केज उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल एन ए बी एच कडून सन्मानित

37

कृष्णा डायग्नोस्टिक लि. केज उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल एन ए बी एच कडून सन्मानित

केज दि १२(प्रतिनिधी): केज येथील उपजिल्हा रुग्णालयात कृष्णा डायग्नोस्टिक लि. सिटीस्कॅन सेवा देणाऱ्या या खाजगी कंपनीस रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल न्यू दिल्ली एन ए बी एच यांच्याकडून सन्मानपत्र प्राप्त झाले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रेय केंद्रे, स्त्री रोग तज्ञ डॉ इंगोले,डॉ हनुमंत सौदागर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

मॅनेजर विवेकानंद स्वामी , तंत्रज्ञ अशोक दहिफळे, बाजीराव चाटे,अभिजित थोरात, सिद्धार्थ मुंडे,ज्ञानदेव मुंडे सुषमा सोनवणे यांनी दिलेल्या सेवेबद्दल हे सन्मानपत्र प्राप्त झाले आहे

ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिल्याबद्दल हे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यापुढील कालावधीमध्येही २४ तास सेवा उपलब्ध राहील अशी माहिती कंपनीचे प्रमुख स्वामी विवेकानंद यांनी दिली.