जितेंद्र केदार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव प्रतिनिधी
खंडू महाले मो. 7796296480
वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र केदार यांचा वाढदिवस आज दिनांक 15 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
जितेंद्र केदार हे समाजातील तळागाळातील लोकांसाठी वेळोवेळी धावून येत असल्याने ते तरूणांच्या गळयातील ताईत बनले आहे . आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेने जितू भाऊ हे प्रत्येकाच्या मदतीला धावून येत असल्याने त्यांनी तरूणांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे.
सामाजिक कार्या ची सुरूवात जितू भाऊ यांनी कॉलेज ला असतांना सुरूवात केली. समाजासाठी धावून येणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांची आेळख अल्पावधीतच झाल्याने समाजातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे. जितू भाऊ यांनी आपल्या आपुलकीच्या बळावर समाजात आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज जितू भाऊ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यांवर प्रेम करणाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दैनिक खान्देश विश्ववेध चे मुख्य संपादक शैलेश पाटील खंडू महाले पत्रकार अनुप पानपाटील वंचित बहुजन आघाडी महानगर अध्यक्ष दादासाहेब राठोड सामाजिक कार्यकर्ते सचिन अडकमोल राहूल भाऊ सुरवाडे पवन तायडे सुरेश साळुंखे बबलू शिंदे प्रदीप सोनवणे पिटू कोळी भूषण पाटील विक्की अहिरे शेखर सोनवणे व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.