मुंबई गोवा महामार्गावर मोटार सायकल व अज्ञात वाहणाचा भीषण अपघातात बाईकस्वार जागीच ठार...
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-मुबई कडून गोवा कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तळेगाव वाडी येथे रात्री 8.30 सुमारास लोणेरे येथुन येणारा, दुचाकीस्वार अमित जयस्वाल. याना जोरदार धडक देऊन पोबारा केला .यामध्ये अमित जयस्वाल याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला .
हि घटना स्थानिक लोकांना समजल्यावर लोक घटनास्थळी दाखल होऊन उप जिल्हा रुग्णायल माणगाव यांना कळविण्यात आले .रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने मयत अमित जैस्वाल यास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे हलविण्यात आले .मिळालेल्या माहिती नुसार मयत अमित जैस्ववाल स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोणेरे येथे बँक मॅनेजर होते रात्री 8.वाजण्याच्या सुमारास लोणेरे ते माणगांव आपल्या मोटार सायकल क्र.एम एच 12 जेटी 773 ने प्रवास करीत असताना कोणत्या तरी अज्ञान वाहनाने ठोकर देऊन पोवारा केला या अपघातात मयत अमित जैस्ववाल याचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात वाहनाविरुद्ध कॉ.गु. रजि नं 08/2023 भा. द. वी स कलम 304 अ 279,337.338मोटार वाहन कायदा कलम 184,134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून . पुढील तपास माणगांव येथील गोरेगाव पोलीस स्टेशनंचे सह. पोलीस निरीक्षक एस एस नावले यांच्या मार्गदर्शनखाली सह. फो.आर डी फाळके, पो. नाईक एम जी मोरे हे करीत आहेत.