अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस.तब्बल चाळीस वर्षांनी एकत्र येत आखली अनोखी योजना.

53

अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस.तब्बल चाळीस वर्षांनी एकत्र येत आखली अनोखी योजना.

अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस.तब्बल चाळीस वर्षांनी एकत्र येत आखली अनोखी योजना.

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेण मधील कोकण एज्युकेशन सोसायटीची इंजीनियरिंग कॉलेजची इमारत अनेक वर्षापासून बंद आहे, यामध्ये १९८३ ते २००८ पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जगभरात जाऊन उच्चपदावर नोकरी केली आहे.

याच आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यानी तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र येत पुन्हा एकदा नवीन कॉलेज सुरू करण्यासाठी आणि पुढील पिढीला आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा मिळण्यासाठी व शिक्षणाचे महत्त्व समजाविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

यावेळी या पुन:र्मिलनासाठी जगातल्या अनेक देशांतून या कॉलेजचे माजी विद्यार्थी आले होते.अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यासह अनेक देशांत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी जवळपास ७०० च्यावर या कार्यक्रमात माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचाही समावेश होता.यावेळी नविन कॉलेज उभारल्यास पुढील कॉलेजमध्ये एमपीएससी – युपीएससीचे व अभियांत्रिकी वर्ग सुरू करण्याचा मानसही बोलून दाखविला.

तर ज्या कॉलेजने आम्हाला ज्ञान आणि श्वास दिले, त्या शहरात हजारो झाडांची लागवड आणि पुढील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आधारित मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करणार असल्याचेही सांगितले.

या कार्यक्रमात “संविध” विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

त्यामुळे या आगळ्या वेगळ्या संकल्पित सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी “आई डे केअर” गतिमंद मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या मा. डॉ. स्नेहलता देशमुख भुतपूर्व कुलगुरू मुंबई विद्यापीठ, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचे लाडके श्री. शरद गणपुळेसर, प्रा.श्री.आर. बी. महाजन, कॉलेजच्या पहिल्या (१९८३) बॅचचे विद्यार्थी आणि म्हाडा मधील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले श्री. राजीव शेठ आदींच्या आयोजन कमिटीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.