पुण्यात ट्रकचा भीषण अपघात; दूध देणाऱ्या ८ म्हशी जागीच ठार यात दोन म्हशी जखमी झाल्याअसून ट्रकमधील अन्य दोन व्यक्ती देखील जखमी झाल्या आहे.

49

पुण्यात ट्रकचा भीषण अपघात; दूध देणाऱ्या ८ म्हशी जागीच ठार
यात दोन म्हशी जखमी झाल्याअसून ट्रकमधील अन्य दोन व्यक्ती देखील जखमी झाल्या आहे.

पुण्यात ट्रकचा भीषण अपघात; दूध देणाऱ्या ८ म्हशी जागीच ठार यात दोन म्हशी जखमी झाल्याअसून ट्रकमधील अन्य दोन व्यक्ती देखील जखमी झाल्या आहे.

हिरामण गोरेगावकर

10 जानेवारी 2023
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे एक मोठा अपघात झाला आहे. म्हशी घेऊन जाणाऱ्या टेंपोचा भीषण अपघात होऊन आठ म्हैशींचा जागीच मृत्यु झालाय. यात दोन म्हशी जखमी झाल्याअसून ट्रकमधील अन्य दोन व्यक्ती देखील जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण नगर महामार्गावर गायमुखवाडी गावाजवळ हा भयंकर अपघात झला आहे. या अपघातात कल्याण नगर महामार्गावर ओतुरवरून आळेफाटाच्या दिशेने जात असताना ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे समजले आहे.
अपघात झाल्यावर लगेच स्थानिक ग्रामस्थांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने ट्रकला बाजुला करण्याचे कामही सुरू आहे. या अपघातात आठ म्हशींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पावलेल्या सर्व म्हशी या दूध देणाऱ्या होत्या. यात शेतकऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे.