असोसिएशन ऑफ मुंबई योग डिस्ट्रिक्ट आणि मुंबई उपनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्याद्वारे योगासनस्पर्धातील मुंबई संघामध्ये खेळाडूंनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०
मुंबई- महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने आणि नाशिक जिल्हा शासनाच्या व क्रीडा विभागाच्या सहकार्याने राज्याची प्रतिष्ठीत मिनी ऑलिम्पिक योगासन स्पर्धा नाशिक, हिरेवाडी या ठिकाणी स्पर्धा दिनांक 2 ते 5 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाल्या.
सदर स्पर्धेमध्ये मुंबईचे पाच मुले व आठ मुली यांनी दहा स्पर्धाप्रकारात सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले. सहभागी झालेल्या दहा प्रकारांपैकी एक सुवर्ण, एक रजत आणि दोन कांस्यपदक तसेच सहा उत्तेजनार्थ बक्षीसे पटकावून घवघवीत यश संपादन केले तसेच खेळाडूंच्या स्पर्धा प्रकारानुसार अंतिम निकाल सोबत जोडला आहे.
सदर स्पर्धेचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर दिनांक 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 रोजी मुक्तांगण आणि राजाराम स्पोर्ट्स अकादमी मुंबई येथे घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये श्री महेश कुंभार आणि श्रीमती रुचिता ठाकूर यांनी खेळाडूंचा स्पर्धेमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्याबरोबर शिबिरामध्ये श्री रुपेश मयेकर , निकिता सिंगल, श्वेता पाटील, प्राजक्ता खवळे यांनी मार्गदर्शन केले. अजय कांबळे व अनिश कोळगे यांनी नृत्य प्रशिक्षण दिले. मुंबई जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री घनश्याम धोकरट सर यांनी खेळाडूंना व प्रशिक्षणांना शिबिरादरम्यान मार्गदर्शन केले आणि योग प्रदर्शनासाठी गरजेच्या मॅट उपलब्ध करून दिल्या. तसेच मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे सुद्धा मोलाचे योगदान लाभले.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स फेडरेशन अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ मुंबई योगासन डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यामाने दि. 18 डिसेंबर 2022 रोजी बंटर भवन, कुर्ला येथे मिनी ओलंपिक योगासन निवड चाचणी घेण्यात आली. श्री मनोज वर्मा यांनी अगदी कमी वेळात स्पर्धा हॉल उपलब्ध करून दिले. सदर स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी ट्रॅडिशनल प्रकारांमध्ये प्रथम तीन आणि इतर प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केले होते अशाच खेळाडूंची निवड ही मिनी ओलंपिक योगासन क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यात आली होती.
………………………………………..
मुंबई संघामध्ये खालील खेळाडूंनी सहभाग घेऊन यश संपादन केले.
◼ मुले
▪आर्टिस्टिक गृप -रजक पदक
१) रुद्र दातखिले
२) सिद्धेश रहाटे
३) सागर शितकर
४) शिवम त्रिपाठी
५) हर्ष छेडा
▪ आर्टिस्टिक पेयर -चतुर्थ
१) सागर शितकर
२) सिद्धेश रहाटे
▪ रिदमिक पेयर -पाचवा
१) रुद्र दातखिले
२) शिवम त्रिपाठी
▪ आर्टिस्टिक सिंगल
१) सागर शितकर- तृतीय
२) सिद्धेश रहाटे- पाचवा
▪ ट्रॅडिशनल योगासना- सहभाग
१) हर्ष छेडा
२) रुद्र दातखिले
३) शिवम त्रिपाठी
◼ मुली
▪ आर्टिस्टिक गृप -सुवर्ण
१) दिशा तगारे
२) मिहीका तावडे
३) प्रियंका पोस्टुरे
४) शिवानी मुनगेकर
५) सुप्रिया नमसले
▪ आर्टिस्टिक पेयर -तृतीय
१) शिवानी मुनगेकर
२) सुप्रिया नमसले
▪ रिदमिक पेयर-पाचवा
१) मिहीका तावडे
२) प्रियंका पोस्टुरे
▪ आर्टिस्टिक सिंगल
१) दिशा तगारे- चतुर्थ
२)मिहीका तावडे -सहावा
▪ ट्रॅडिशनल योगा -सहभाग
१) अक्षता कदम
२) पवित्रा मुन्नुस्वामी
३)काजल काळे