ग्राम सम्मेलन व भव्य खंजेरी भजन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उल्लेखनीय कामगिरीबद्दल १०० व्यक्तींचा सत्कार.

54
ग्राम सम्मेलन व भव्य खंजेरी भजन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उल्लेखनीय कामगिरीबद्दल १०० व्यक्तींचा सत्कार.

ग्राम सम्मेलन व भव्य खंजेरी भजन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल १०० व्यक्तींचा सत्कार.

ग्राम सम्मेलन व भव्य खंजेरी भजन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उल्लेखनीय कामगिरीबद्दल १०० व्यक्तींचा सत्कार.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ग्राम सम्मेलन व भव्य खंजेरी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०० व्यक्तींचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ५ व्यक्तींना कळमना ग्रामपंचायत कडून डॉक्टरेट उपाधी देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटन माजी आमदार अँड वामनराव चटप यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य पुरस्कार प्राप्त राजगड चे आदर्श सरपंच चंदु पाटील मारकवार, विशेष अतिथी माजी आ. सुदर्शन निमकर, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, माजी सभापती अरुण निमजे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे , अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अँड. देवाभाऊ पाचभाई, ग्रामगीताचार्य मारोती सातपुते, आदिवासी नेते बापुराव मडावी, भोई समाजाचे विभागीय अध्यक्ष कुषणाजी भोयर, अ. भा. सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारखी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आदर्श सरपंच चंदु पाटील मारकवार यांनी सांगितले की जोपर्यंत गावातील नागरिक राष्ट्रसंतांच्या विचारानुसार गावाला तिर्थ मानुन गावाच्या उन्नतीसाठी झटणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने गावांचा सर्वांगीण विकास होणार नाही. त्यामुळेच ग्रामसंमेलनाचे हे यशस्वी आयोजन कळमनाचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी केले असावे. नंदकिशोर वाढई हे दुरदृष्टी ठेवून निर्णय, विकासाचा ध्यास, गावाबद्दल आस्था असलेले व्यक्तीमत्व आहे. म्हणून त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे गावकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे. अशी ध्येयवेडी माणसे फार कमी जन्माला येतात आणि ती तुमच्या गावात जन्माला आली हे तुमचं भाग्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे गाव महाराष्ट्रात आदर्श गाव झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नंदकिशोर वाढई यांनी ग्रामगीतेचा विचार प्रत्येकानी आचरणात आणला तर गावाचा सर्वांगीण विकास होण्यास कोणीही थांबवू शकणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे उपसरपंच कौशल्य मनोहर कावळे, ग्राम पंचायत सदस्य दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेळे, सुनिता उमाटे, रंजना दिवाकर पिंगे, प्रियंका गेडाम, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, निंबाळा चे पोलीस पाटील गोपाल पाल, ग्रामसेवक सिताराम मरापे, भाऊजी पाटील वाढई, माजी सरपंच बापुजी पाटील वाढई, सुधाकर पिंपळशेळे, माजी सरपंच सचिन बोंडे, टेंबुरवाही चे सरपंच रामकृष्ण मडावी, परमडोह चे सरपंच वाभीटकर, मंगेश ताजणे , सुमनबाई बोबडे, सरला डाखरे, तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य यासह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद चलाख सरांनी केले. आभार प्रदर्शन बाळकृष्ण पिंगे यांनी मानले.