घरफोडी करणारे चोर मुद्देमालासह अवघ्या ६ तासाच्या आत जेरबंद; नेरळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३
नेरळ :- दि. १० जानेवारी ते ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता नेरळ येथील मौजे खांडा परिसरात राहणारे महेंद्र शंकर दुबे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार १२ जानेवारी रोजी ०२.१५ वाजत नेरळ पोलीस ठाणे येथे रजी.०५/२०२४ भा.दं.वि.सं कलम ४५४,४५७,२८० प्रमाणे नोद झाला असून यात फिर्यादी यांनी रुपये ३,२५,३५० किमतीचे सोन्याचे दागिने व २०१५ रुपये रोख रक्कम गेल्याचे सांगितले त्या अनुषंगाने नेरळ पोळीचे ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी एक टीम तयार करून तपास सुरु केला व अवघ्या ६ तासांच्या आत पो.उप.नि. लिंगप्पा सरगर, सहा.फौ.श्रीरंग किसवे. पो.ह. नवनाथ म्हात्रे यांनी महेंद्र दुबे यांच्याच घरा शेजारी राहणारा संशयित म्हणून अविनाश रामसिंग राठोड वय २४ वर्षे याची कायदेशीर रीत्या चौकशी केली असता आरोपीने त्याच्या साथीदाराने चोरी केल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने अयाउद्दीन निजमुद्दिन शेख वय २१ वर्षे राहणार नेरळ खांडा या आरोपीच्या मुसक्या आवळ्या व चौकशी दरम्यान कबुली दिली की चोरी आम्हीच केली आहे व सर्व मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात नेरळ पोलिसांना यश आले. पोलिसांच्या कामगिरी मुळे नागरिकांकडून कौतुक होत आहे.