मुंबई : हॉकीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात होणाऱ्या हॉकी विश्वकपमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा हॉकी संघ भारतात येणार आहे. पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्याने भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा अटीतटीचा सामना पुन्हा एकदा हॉकी चाहत्यांना पाहता येणार आहे.
ओडिशामधील भुवनेश्वर येथे यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये विश्वकप खेळवण्यात येणार आहे. याआधी २०१० मध्ये भारतात हॉकी विश्वकपचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशा सरकारने भारतीय हॉकीच्या पुरूष आणि महिला दोन्ही संघासाठी स्पॉन्सर बनणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. हॉकीला प्रमोट करण्यासाठी ओडिशा सरकारने उचललेलं हे पहिलं पाऊल आहे.
दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हॉकी इंडियाच्या एका कार्यक्रमात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पाच वर्षांपर्यंत हॉकी टीमचे प्रायोजक बनणार असल्याची घोषणा केली असून या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाच्या नव्या जर्सीचेही अनावरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here