मुंबई :’ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला…’ असं जिच्याबद्दल सध्या सगळीकडं बोललं जातंय, त्या प्रिया प्रकाश वारियार हिचं मन मात्र वेगळ्याच तरुणावर जडलंय. हा तरुण दुसरा-तिसरा कुणी नसून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रियानं हा ‘हार्टब्रेकिंग’ खुलासा केलाय. ‘मला क्रिकेट पाहायला खूप आवडतं आणि धोनी हा मला खूप आवडतो,’ असं तिन सांगितलंय. तिच्या या ‘क्रश’ची चर्चाही सध्या सोशल मीडियात रंगली आहे. प्रियाचा ‘उरू अदार लव्ह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यातील लाजवाब एक्स्प्रेशन्समुळं प्रिया घराघरात पोहोचली आहे. एका गाण्यामुळं ‘नॅशनल क्रश’ ठरलेल्या प्रियाच्या चित्रपटाबद्दल आता प्रचंड उत्सुकता आहे.