Nalasopara mob lynching, three women beaten by residents in Nalasopara
Nalasopara mob lynching, three women beaten by residents in Nalasopara

नालासोपारा मॉब लिंचिंग, नालासोपाऱ्यात चोर समजून तीन महिलांना रहिवाशांनी दिला चोप.

Nalasopara mob lynching, three women beaten by residents in Nalasopara
Nalasopara mob lynching, three women beaten by residents in Nalasopara

राकेश जाधव प्रतिनिधी

नालासोपारा:- 12 तारखेला नालासोपारा परीसरा मॉब लिंचिंगची घटनेने खळबळ उडाली आहे. परीसरातील नागरीकांने तीन महीलेला बेभान मारल्याचे समोर आले आहे.

पालघर मध्ये झालेल्या मॉब लिंचिंगची पुनरावृत्ती नालासोपाऱ्यात होता-होता  टळली आहे. नालासोपारामध्ये चोर समजून तीन महिलांना एका सोसायटीतील रहिवाशांनी चोप दिला आहे. सध्या या महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या श्री प्रस्त परिसरातील ब्लुबेरी बिल्डिंगमध्ये 12 तारखेला दुपारच्या सुमारास तीन महिला देणगी मागण्यासाठी गेल्या होत्या. स्थानिक रहिवाशांनी मुले चोरणारी टोळी समजून महिलांना गेटमध्ये डांबून मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नालासोपारा पोलिसांना घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिन्ही महिलांना ताब्यात घेतले होतं. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. महिला देणगीसाठी आल्याचं सांगून महिलांना समज देऊन सोडल्याची माहिती नालासोपारा पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली आहे.

महिलांना मारहाण केलेल्या सोसायटीतील लोकांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. या मारहाणीत जर महिलांसोबत कोणता अनुचित प्रकार घडला असता, तर याला जवाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here