*एक गुंठा जमीन व २५ हजार रुपयांची लाच मागणारी महिला कोतवाल ‘एसीबी’ च्या जाळ्यात*

*पुणे* – जमिनीच्या आरटीएस फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी एक गुंठा जमीन व २५ हजार रूपयांची मागणी करणारी महिला कोतवाल ‘एसीबी’च्या जाळ्यात सापडली आहे. हवेली तहसीलदार कार्यालयात अभिलेख कक्षात कोतवाल पदावर ही महिला कर्मचारी कार्यरत आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. सुवर्णा कटर भोसले (वय ३४, पद – कोतवाल, अभिलेख कक्ष, हवेली तहसीलदार कार्यालय) असे या महिलेचे नाव आहे.

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बालेवाडीतील जागेच्या आरटीएस फाईलची छायांकित प्रत मिळावी यासाठी हवेली तहसीलदार कार्यालयात अभिलेख कक्षात अर्ज केला होता. या फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी कोतवाल महिलेने तक्रारदाराकडे एक गुंठा जमीन व २५ हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती तिने १५ हजार रूपये स्विकारले.

लाचलुचपत विभागाने गुरूवारी याबाबत पडताळणी करून त्याच दिवशी सापळा रूचून महिलेला ताब्यात घेतले. कोतवाल महिला कर्मचा-यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस निरिक्षक अलका सरग करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here