20 हजार शेतकऱ्याचे चुकारे अडकले. बळीराजाच्या आर्थिक अडचणीत वाढ?

20 हजार शेतकऱ्याचे चुकारे अडकले. बळीराजाच्या आर्थिक अडचणीत वाढ?

20 हजार शेतकऱ्याचे चुकारे अडकले. बळीराजाच्या आर्थिक अडचणीत वाढ?

✍ विनोद कोडापे✍
8380802959
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली मीडिया वार्ता

गडचिरोली, शेतातील धान पिकाला योग्य योग्य दर प्राप्त व्हावा या उदार हेतूने शेतकऱ्यांनी आपले उत्पादी धान विक्री साठी आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेले मात्र गडचिरोली प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या 55 खरेदी केंद्रावर धान विक्री करून बराचसा कालावधी लोटूनही तब्बल 20 हजारावर शेतकऱ्याचे चुकारे मिळालेल्या नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे धानाचे चुकारे केव्हा मिळणार अशी विचारणा या शेतकऱ्याकडून होत आहे.

गडचिरोली प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या 55 आधारभूत खरेदी केंद्रावर शासनाने दिलेल्या दुसऱ्या मुदतीच्या अंतिम तारखेपर्यंत तब्बल 31 हजार 246 शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे. यातील 11 हजार 73 शेतकऱ्यांना धान खरेदी पोटी 63 कोटी 44 लाख 29 हजार 140 रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र अद्यापही 20 हजार 167 शेतकऱ्यांना चुकऱ्या पोटी 35 कोटी रक्कम देणे शिल्लक आहे.

धान विक्री करून अनेक दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही राज्य शासनाकडून शेतकऱ्यांनच्या खात्यात धान विक्री ची मूळ रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सदर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून सावकारी सेवा व सहकारी बँक तसेच खाजगीत घेतलेले कर्ज कसे फेडावे कुटुंबाचा उदनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here