बुद्धाच्या तत्वांची अंमलबजावणी करण्यातच व्यवस्था परिवर्तन शक्य : प्रा,महेंद्र बोरकर

60

बुद्धाच्या तत्वांची अंमलबजावणी करण्यातच व्यवस्था परिवर्तन शक्य : प्रा,महेंद्र बोरकर

बुद्धाच्या तत्वांची अंमलबजावणी करण्यातच व्यवस्था परिवर्तन शक्य : प्रा,महेंद्र बोरकर

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-समाजसुधारणेच्या बाबतीत प्रथम क्रांतिकारी समाज सुधारक आणि त्यातही सर्वात श्रेष्ठ असे गौतम बुद्ध आहेत. समाजसुधारणेचा इतिहास मुळात बुद्धापासूनच सुरु होतो. समाजसुधारणेचा इतिहास बुद्धाचा इतिहास सांगितल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. क्रांती म्हणजे व्यवस्था परिवर्तन – अस्तित्वात असलेली एक व्यवस्था पूर्णता नष्ट करून त्याच्या जागी दुसर्‍या सिद्धांतावर आधारित व्यवस्था निर्माण करणे याला जगात क्रांती असे म्हणतात म्हणजेच क्रांतीचा संबंध व्यवस्था परिवर्तनाची आहे आणि बाबासाहेब बुद्धाला क्रांतिकारक म्हणतात म्हणजेच या देशात बुद्धाची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई होती हे स्पष्ट होते. व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढत असताना बुद्धांनी दुःखाची तीन कारणे सांगितली एक नैसर्गिक दुःख, दुसरं वैयक्तिक दुःख आणि तिसर सामुदायिक दुःख आणि या दुःखाच्या निवारणासाठी पंचशिल, अष्टांगिक मार्ग आणि दस पारमिता हे उपाय सुद्धा सांगितले. बुद्ध फक्त इथेच थांबले नाही तर याही पलीकडे जाऊन त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर जबरदस्त हल्ला चढविला. याचबरोबर त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता न्याय आणि शांतीची शिकवण दिली. तसेच प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे सुद्धा सांगितले. म्हणून बुद्धांनी सांगितलेल्या या तत्वाची अंमलबजावणी करण्यातच व्यवस्था परिवर्तन शक्य आहे. असे स्पष्ट आणि परखड मत प्रा.महेंद्र बोरकर यांनी तीन दिवशीय बौद्ध धम्म परिषदेच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
*ढोरपा* (मौशी) येथील रमाई महिला संघ आणि बौद्ध समाज ढोरपा यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध धम्म परिषद 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2022 ला आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात सकाळी 7 वाजता भन्ते महानाम महास्तविर नागपूर यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडला. तसेच रामदासजी खोब्रागडे अध्यक्ष बौद्ध समाज ढोरपा हे उपस्थित होते. सकाळी 8 वाजता बुद्ध वंदना, धम्म रॅली व धम्मदेसनेला सुरुवात झाली. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. तारक माटे यांनी ‘सम्राट अशोकाच्या भारत निर्मितीकरिता बौद्ध धम्माची गरज’ या विषयावर प्रबोधन केले तसेच प्रा. महेंद्र बोरकर यांनी ‘बुद्धाची व्यवस्था परिवर्तनाची चळवळ आणि आजची प्रासंगिकता’ या विषयावर आपल्या ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण विचारातून वरील मत व्यक्त केले.
या धम्म परिषदेचे संचालन जयंतकुमार रामटेके तर आभार सुमेरण बागडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा अशोक शिंगाडे सर, सुधाकर मेश्राम, मुखरूजी निशाणे, शंकरजी उंबरकर तसेच ढोरपा वासी व बाहेरून आलेले इतर श्रोतावर्ग व गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य केले.