वर्धा जिल्ह्यात मनसे चे ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वर्धा जिल्ह्यात मनसे चे ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वर्धा जिल्ह्यात मनसे चे ५० पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा : १५/०२/२०२२ जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले असून, अतुल वांदिले यांच्या पाठोपाठ आता मनसेच्या तब्बल ५० पदाधिकाऱ्यांनी अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. यामुळे मनसेला मोठा झटका बसला आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकरसह ५० मनसे पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्कप्रमुख सुबोध मोहिते, जिल्हा निरीक्षक राजू ताकसाळे, युवा राष्ट्रवादी काँगेसचे सूरज चव्हाण, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वरपे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप किटे, दशरथ ठाकरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here