मुंबईतून घसरलेला मराठी टक्का आणि महाराष्ट्र संरक्षण संघटना

80
मुंबईतून घसरलेला मराठी टक्का आणि महाराष्ट्र संरक्षण संघटना

मीडिया वार्ता न्युज
१५ फेब्रुवारी, मुंबई: रविवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा जतन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी कार्यरत महाराष्ट्र संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची मुंबई जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. या कार्यकारिणीत मराठीबद्दलआस्था असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेशआहे. पदाधिकारी नियुक्तीचा हा सोहळा भाऊचा धक्का येथील एका प्रवासी बोटीवर मोठ्या दिमाखदार स्वरूपात पार पडला.

मुंबईतून घसरलेला मराठी टक्का व त्यामुळे मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी मुलांचा रोजगार यावर झालेले परिणाम ही चिंताजनक बाब झाली आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र संरक्षण संघटनेने मराठी लोकांची मुंबई शहरामध्ये बिगर राजकीय एकजूट बांधण्याचा संकल्प केला आहे.

मुंबई जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत मयेकर यांची नेमणूक केल्याचे आज कार्याध्यक्ष धर्मेंद्र घाग यांनी जाहीर केले. मुंबई शहरांत पुन्हा मराठी टक्का वाढावा यासाठी मुंबई जिल्हा कार्यकारिणी विविध कार्यक्रम राबवून काम करणार आहे. मराठी मुलांचा रोजगार, मराठी शाळा, मराठी भाषा इत्यादी विषयासाठी सातत्याने काम करणार आहे.

हे आपण वाचलंत का?

मुंबई कार्यकरीणीत समीर बामणे यांची कोषाध्यक्ष म्हणून तर, उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र देसाई, लहू साळवी यांची नियुक्ती करण्यात आली. सरचिटणीसपदी राजेश पेडणेकर व संदेश घोडके, सचिवपदी मोहन निकम, अजित खेतले, विनायक दाभोळकर यांची नियुक्ती करण्यात आली. ॲड सुनील कदम, ॲड मनोज नाईक, नितीन खेतले, सागर पवार, रुपेश बागवे, प्रवीण बागवे, राजेश कोयंडे, दिलीप सावळ, घन:श्याम नागुलकर, जयेश पांचाळ, राकेश पावसकर, संदीप दिघे यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हा अध्यक्ष म्हणून चेतन तोंडवळकर, राजेंद्र गोलतकर, सुनील सावंत तर, विभाग अध्यक्षपदी विनायक शेगडे, देवदास जाधव, मयुर मयेकर, परेश पावसकर, नितीन शिर्के आणि प्रभाग अध्यक्ष म्हणून सचिन लोंढे, सुधाकर सुर्वे,सचिन तांबे व मुकेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केतन वेदक यांची ठाणे शहर तर सुजाक सुके यांची देवगड तालुका समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती सोहळ्यास मनोहर साळवी, ॲड प्रभाकर पारसे, तरुण भोगले, प्रकाश नामे, मंदार नार्वेकर, रवींद्र कुवेसकर, मंगेश उनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सर्व नियोजन समीर बामणे यांनी केले होते. तर सूत्रसंचालन संस्थापक समन्वयक प्रमोद मसुरकर यांनी केले.