पंकज तांबे यांच्या हस्ते रायगड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे सुरत येथे उदघाटन

60

पंकज तांबे यांच्या हस्ते रायगड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे सुरत येथे उदघाटन

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

   माणगांव :-गुजरात राज्यात सुरत या ठिकाणी 11व 12 फेब्रुवारी रोजी रायगड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाट्न रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्या हस्ते, क्रिकेट संघांचे खेळाडू व मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले. ही स्पर्धा कासानगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कतारकगाम सुरत येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत जिया टायगर, साई आशिष ग्रुप, पाणेश्वरी फायनान्स ग्रुप, नैतिक फायटर, श्री समर्थ इलेव्हन, इशान इलेव्हन पोल्स इलेव्हन,मास्टर इलेव्हन या आठ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धा सुरु होण्या अगोदर मैदानात मान्यवर, संघमालक, खेळाडू यांच्या समवेत राष्ट्रगीत घेण्यात आले व पंकज तांबे यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात केली.

या स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मांघरूण सुरत आणि मराठा समाज क्रिकेट असोसिएशन सुरत यांच्या मान्यतेने उत्तमरित्या केले आहे.

या स्पर्धेसाठी माणगांव तालुक्याचे मा. ग्रामपंचायत सदस्य रणधीर कनोजे,गणेश सावंत, संपत कनोजे,स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल शिर्के, उपाध्यक्ष संभाजी गायकवाड, महाड व माणगांव तालुक्यातील मान्यवर, क्रिकेट खेळाडू यांची विशेष उपस्थिती होती.या स्पर्धेत सहभागी खेळाडू यांना पंकज तांबे यांनी प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला उदघाटनाच्या दिवशी पंकज तांबे यांची उपस्थिती आकर्षणीय ठरली.या स्पर्धेत सहभागी खेळाडू हे कोकणातील असून स्पर्धा रायगड प्रीमियर लीग सुरत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे कोकणातील अनेक क्रिकेट शौकीन यांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी रुपेश कोंडालकर, राजेश शिंदे, अनिल कोंडालकर अजय पवार, नागेश लुष्टे, अनिल शिंदे, चंद्रकांत धनावडे, संजय देविलकर वसंत कदम, अजय देविलकर, , सुरेश शिंदे, तेजस मोरे, गणेश ठुले संतोष जाधव, जयेश जाधव, भावेश कदम, नरेश कदम हे मेहनत घेत आहेत.शेवटी आयोजकांनी पंकज तांबे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच रणधीर कनोजे, स्वप्निल शिर्के, संभाजी गायकवाड यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .