पत्रकारांच्या संरक्षणाविषयी आगामी अधिवेशनात आवश्यक ती पावलं उचलणार-उपसभापती गोर्हेंची माहिती…
जितेंद्र कोळी
पारोळा प्रतिनिधी
पत्रकारांवरील हल्ल्याबाबत पोलिसांनी तातडीने चौकशी करायला हवीय. पत्रकारांच्या संरक्षणाबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
औरंगाबादहून पुण्याकडे जात असताना अहमदनगर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
रत्नागिरी येथील शशिकांत वारीसे हे कर्तव्यदक्ष कार्यक्षम पत्रकार होते. त्यांच्या मृत्यूमध्ये खुनाच्या संशयाला वाव आहे. पोलीस अधीक्षकांशी माझे याबाबत बोलणे झाले.
वारिसे यांना व्यक्तिगत 51 हजार रुपयांची मदत करत असल्याचे उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकारांवर होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी अजून काय करता येईल याबाबत चर्चा करून सरकारकडे उपाययोजनेसाठी आग्रह धरण्यात येईल असे त्यांनी सांगितले.