एक शाम रखवालो के नाम’ थाटात पत्रकार आणि पोलिसांचा सत्कार

51
एक शाम रखवालो के नाम' थाटात पत्रकार आणि पोलिसांचा सत्कार

एक शाम रखवालो के नाम’ थाटात

पत्रकार आणि पोलिसांचा सत्कार

एक शाम रखवालो के नाम' थाटात पत्रकार आणि पोलिसांचा सत्कार

🖋️ साहिल सैय्यद…..
तालुका प्रतिनिधि घुग्घुस
📲 9307948197

घुग्गुस :- घुग्घुस येथे ‘एक शाम रखवालो के नाम’ हा सांस्कृतिक कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
घुग्घुस शहरातील पत्रकार बांधव आणि पोलिस बांधवांचा सत्कार करण्यासाठी सोमवार, १२ फेब्रुवारी व मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरात करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, विशेष उपस्थिती संजीवनी पर्यावरण संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष राजेश बेले, प्रबोधनी नागरी सहकारी पतसंस्था चंद्रपूरच्या अध्यक्षा अनुश्री दहेगांवकर, स्वागताध्यक्ष रवीश सिंग, प्रमुख पाहुणे माजी जि.प. सभापती नितु चौधरी, सिनू गुडला, प्रेम गंगाधरे, सत्कारमुर्ती दैनिक सकाळ घुग्घुसचे प्रतिनिधी मनोजकुमार कनकम, दैनिक नवभारत घुग्घुसचे प्रतिनिधी दयाशंकर तिवारी, प्रभारी ठाणेदार प्रशांत साखरे, दैनिक लोकमत घुग्घुसचे प्रतिनिधी गजानन साखरकर, दैनिक देशोन्नती घुग्घुसचे प्रतिनिधी श्रीकांत माहुलकर, दैनिक पुण्यनगरी घुग्घुसचे प्रतिनिधी सुरेश खडसे, दैनिक भास्कर घुग्घुसचे प्रतिनिधी विक्की गुप्ता, दैनिक हितवाद घुग्घुसचे प्रतिनिधी संजय जीवनकर, पोलिस उपनिरीक्षक शाहजी घोडके, गुन्हे पथकाचे प्रकाश करमे, महेश मांढरे, नितीन मराठे, सचिन बोरकर, विनोद वानकर, रामदास आडे, सिद्धार्थ रंगारी, चंपत कांबळे, पुंडलिक कुळमेथे, मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

पत्रकार आणि पोलिसांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला

चित्रकला स्पर्धा प्रथम पुरस्कार दिक्षा येरावार (प्रियदर्शिनी कन्या शाळा), मैथाली ढेंगळे ( माऊंट कॉन्व्हेंट शाळा) द्वितीय पुरस्कार श्रेयश काळे (माऊंट कॉन्व्हेंट शाळा) जैनेब खान ( इरा किड्स शाळा) तृतीय पुरस्कार आर्यन सिंग (ग्रेस कॉन्व्हेंट शाळा), प्रेयसी फुलझले ( माऊंट कॉन्व्हेंट शाळा) चतुर्थ पुरस्कार नैतिक तिवारी ( प्रथमेश कॉन्व्हेंट शाळा) यांना देण्यात आला.

नृत्य स्पर्धा प्रथम पुरस्कार पुर्वा मडावी, मैथाली ढेंगळे, द्वितीय पुरस्कार काव्या बोरकर, अर्पिता मोरपाका तृतीय पुरस्कार शनया सोनटक्के, ऋतुजा वैद्य चतुर्थ पुरस्कार अभिलाषा पोमुलवार, अंशुमन चेनूरवार यांना देण्यात आला.

निबंध स्पर्धा प्रथम पुरस्कार कृपा ढेंगळे (माऊंट कॉन्व्हेंट शाळा) धारा सेनापती (जनता शाळा) द्वितीय पुरस्कार खुशी धोटे (माऊंट कॉन्व्हेंट शाळा), रिधिमा राखुंडे (ग्रेस कॉन्व्हेंट शाळा) तृतीय पुरस्कार वेदिका भोयर (जनता शाळा), ज्योती चव्हाण ( माऊंट कॉन्व्हेंट शाळा) यांना देण्यात आला.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम पुरस्कार रोहित भोस्कर, सक्षम वानखेडे द्वितीय पुरस्कार स्वराज बनसोड, काव्या बोरकर तृतीय पुरस्कार अर्विक ढोके, अंजलीना आरमुला, चतुर्थ पुरस्कार अदवेत सातपुते, ओमकार सुंदरगिरी यांना देण्यात आला.

प्रथम सत्रात नृत्य स्पर्धा पार पडली कार्यक्रमाचे उद्घाटक काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी, ग्रेस कॉन्व्हेंटचे प्राचार्य शामसुंदर नायडू, सुप्रसिद्ध गायिका तथा चंद्रपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या निशा धोंगळे, कामगार नेते सय्यद अनवर, युवक काँग्रेस घुग्घुसचे शहराध्यक्ष तौफिक शेख, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज कन्नूर, अलीम शेख, अनुप भंडारी, रोशन दंतलवार मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले. मोठया संख्येत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

संचालन देव भंडारी, वाणी सोनटक्के व वंशिका दुर्योधन यांनी केले.

संकल्पना मीडिया वार्ता न्यूजचे प्रतिनिधी साहिल सय्यद प्रसिद्धी प्रमुख तभाचे प्रतिनिधी संजय पडवेकर, संयोजक दिलीप पिट्टलवार, अमित बोरकर आयोजक अध्यक्ष दीप्ती सोनटक्के, सुजाता सोनटक्के, यास्मिन सय्यद, माधुरी सुटे, प्रीती तामगाडगे, पुनम कांबळे, नीलिमा वाघमारे, योगिता मुन, वैशाली दुर्योधन, उर्मिला लिहीतकर, भाविका आटे, अविनाश उष्कमल्ला, सन्नी कुम्मरवार, धीरज ढोके, प्रज्योत गोरघाटे, श्रीनिवास आरेल्ली, सुमेध पाटील, अयान सय्यद, वंश पाझारे, धीरज कासवटे अरुण पेरका कुणाल गेड़ाम. अविनाश मेश्राम सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख रोशन आवळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.