दारूच्या नशेत घरात खोलीमध्ये गळफास घेतला.
त्रिशा राऊत नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो
9096817953
उमरेड : मद्यपी तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. घटना शुक्रवारी (ता. शुक्रवारी १४) दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास उघडकीस आली. तुषार ज्ञानेश्वर कायरकर (वय ३२) रा. धुरखेडा असे मृतकाचे नाव आहे.
तुषारला दारूचे व्यसन होते. शुक्रवारी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास दारू पिऊन घरी आला. पत्नीला शिवागाळ करून भांडण केले आणि दारूच्या नशेत घरात खोलीमध्ये गळफास घेतला. पत्नी वैशाली यांच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी कलम १९४ बीएनएसएस अन्वये मृत्यूची नोंद केली. पोलिस निरीक्षक धनाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. संजय देशमुख तपास करीत आहे