BMC सफाई कामगार भरतीत अजब प्रश्न

57

मुंबई:गायनेशियम म्हणजे काय?…लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगरमध्ये काय असते?…सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?…भारताचे ४४ वे सरन्यायाधीश कोण?…हे स्पर्धा परीक्षेतील पेपरमध्ये विचारलेले प्रश्न असावेत, असंच वाटतं ना!…पण नाही, हे भन्नाट प्रश्न मुंबई महापालिकेतील सफाई कामगार भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत विचारण्यात आले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई महापालिकेने नुकतीच सफाई कामगारांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली. दहावी उत्तीर्णांसाठी घेतलेल्या या परीक्षेत अत्यंत कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. हा मुद्दा आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. सर्वसामान्य आणि मागास उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवण्यासाठीच अशा प्रकारचे प्रश्न विचारले का, असा सवाल त्यांनी केला. त्यावर या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिले.