He had sexual intercourse with his wife in front of a minor neighbor's son.

नाबालीक शेजारच्या मुला समोर तो पत्नीबरोबर करायचा शारीरिक संबंध.

 He had sexual intercourse with his wife in front of a minor neighbor's son.

✒️अमरावती जिल्हा प्रतिनिधी✒️
अमरावती, दि.15 मार्च:- अमरावती येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या बेडरुम मध्ये शेजारी राहणा-या अनाथ मुलाला रुमच्या कोप-यात गुपचूप उभे करून त्याच्यासमोर पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या 35 वर्षीय नराधम पतीविरुद्ध अमरावती येथील स्थानिक खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमरावती येथील खोलापुरी गेट पोलिसांनी या प्रकरणात नराधम पतीविरुद्ध भादंविचे कलम 354 (क) सहकलम 12 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगा हा माझा घराशेजारी राहतो. आई-वडील मयत झाल्याने अनेक वर्षांपासून सदर मुलाकडे आरोपी पती व त्याची पत्नीने लक्ष देत आहेत. या परीवाराने त्यांच्या संगोपनासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, सदर महिलेला त्याला मुला समान मानत असते. या दाम्पत्यालाही तीन अपत्ये आहेत.

नराधम आरोपी पती हा पत्नीशी रात्रीच्या वेळी शारिरीक संबंध करीत असताना त्या नाबालीक मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या बेड रुमच्या एका खोप-यात गुपचूप उभे करून त्यांचे अवलोकन करायला लावत असे. मामा कशासाठी नेतात, हे प्रारंभी त्याला कळतदेखील नव्हते. दुसरीकडे पत्नीलाही हा प्रकार माहिती नव्हता. एके दिवशी महिलेला सदर मुलाला घरात असल्याचे निदर्शनास आले आणि ती हादरलीच. पतीला याबाबत विचारणा केल्यावर त्याने त्याची ही विकृती कथन केली.

आपले खासगी आयुष्य पतीच दुसऱ्यापुढे, अर्थात ज्याला मुलासमान मानते व, त्याच्यापुढे उघड करीत असल्याचे लक्षात येताच महिलेला प्रचंड धक्का बसला. त्या सरळमार्गी जीवन जगणाऱ्या महिलेने थेट खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here