दारू साठी पैसे दिले नाही, पतीने कापले पत्नीचे ओठ आणि नाक.

86

दारू साठी पैसे दिले नाही, पतीने कापले पत्नीचे ओठ आणि नाक.

Not paid for alcohol, husband cut wife's lips and nose.

✒️प्रशांत जगताप, क्राईम रिपोर्टर✒️
जोधपुर, दि. 15 मार्च:- राजस्थानच्या जोधपुर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वताःच्या पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीचं नाक आणि ओठ कापले त्यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार पतीला दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून पतीने रागाच्या भरात पत्नीवर हल्ला केला आणि तिचे नाक आणि ओठ कापले आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतंय.

पतीला दारूच मोठ वेसन आहे. तो सकाळपासून रात्रीपर्यंत दारू पितो असायचा. संध्याकाळी त्याने दारूसाठी काही पैसे मागितले. तेव्हा महिलेने त्याला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून तो प्रचंड चिडला आणि संतापाच्या भरात धारदार शस्त्राने त्याने नाकावर आणि ओठांवर वार केले, असं या महिलेनं सांगितलं आहे. बाबूलाल असं पतीचं नाव आहे. बाबूलाल याने महिलेला सोडलं होतं. गेल्या काही दिवसांपासून महिला अन्य एका व्यक्तीसोबत राहत होती. त्या व्यक्तीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर बाबुलाल पुन्हा तिच्यासोबत राहू लागला. दारू पिऊन तो तिला मारहाण करत होता. बाबूलाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.