नागपुरात कोरोनाचा वाढता प्रकोप, नागपुरात आज पासुन लॉकडाउन.
नागपुर बनत आहे कोरोनाची राजधानी?
✒युवराज मेश्राम नागपुर प्रतिनिधी✒
नागपूर, दि. 15 मार्च:- विदर्भात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रकोप वाढत असल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येत आहे. आणि हे प्रमाण नागपुरात तर कोरोनाचा प्रकोप खुप गंभीर असल्याने आज पासुन संपुर्ण लॉकडाउन लावण्यात आले आहे. आज नागपूरला कोरोनाचे 2297 कोरोना बांधीत रुग्ण वाढले आहेत. नागपूर शहरात 1933 आणि ग्रामीण भागात 361 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर आज कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात आज 1409 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नागपुरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्रात नागपूर आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जी चिंता वाढवणारी आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नागपूरात 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वत: रस्त्यावर उतरून या लॉकडाऊनचा आढावा घेत आहेत. याआधी नागपुरात लॉकडाउनला लोकांचा अपेक्षित प्रतिसाद दिसला नाही. बाजारपेठ, दुकान बंद असले तरी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे.
नागपुरात आजपासून 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या काळात नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन घेण्यात आला. आजपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या अनुषंगानं शहरात 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहराच्या सीमा आजपासून सील करण्यात आल्यायत. शहरात विनाकारण फिऱणाऱ्यांविरोधात कारवाई होणारेय. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे.