जून 21 मधे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची डीपी जळाली पण अध्याप लावून दिली नाही, शेतकरी वर्ग हैराण
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड : – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा कार्यालय नागभीड अंतर्गत दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी 29 शेतकऱ्यांनी स्वाक्षरी घेवून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय नागभिड येथे अर्ज सादर केले होते, त्या अर्जावर कोण त्यांच संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जाची दखल न घेता केराच्या टोपलीत अर्ज टाकले असावे असा शेतकरी वर्गाचा भ्रम आहे, नागभीड पासून चंद्रपूर रोड एक किलोमीटर अंतरावर तिडके नाला येथे शेतकऱ्यासाठी डीपी लावण्यात आली आहे, 29 शेतकऱ्यांची लाईन 30 जून 2021 रोजी डीपी जळाली होती संबंधित शेतकऱ्यांनी स्वाक्षरी घेऊन निवेदन कार्यालयात सादर केले होते, संबंधित सहाय्यक अभियंता यांच्यासोबत चर्चा ही केली होती पण अद्याप वरील डीपी लावून देण्यात आली नाही शेतकरी वर्ग विद्युत पुरवठा न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतात असलेले उभे पीक नष्ट झाले आहे,प्रत्यक्षात संबंधित शेतकरी वर्ग नविन डी,पी, लावून मिळण्याबाबत साह्यायक अभिंयंता म,रा,वि, कार्यालय नागभिड येथे अधिकांऱ्याची भेट घेवून सुध्या अध्याप कोणतीच कार्यवाही केलेली नाही,यामुळे कृषी पंप धारक हैरान झाले आहे,
काही शेतकरीनी विद्युत बिलाची रक्कम न भरल्या मुळे विद्युत पुरवठा खंडीत केलेला आहे,काही शेतकरी वर्गानी बिल भरले आहेत त्यावर कोणतेच अधिकाऱ्यांनी विचार केले नाही,
॥प्रतिक्रिया॥
साह्यायक अभिंयंता मा,सदावती साहेब म,रा,वि,मं कार्या,यांनी उप-विभागिय कार्या,म,रा,वि,म नागभिड डि,पी, लावून मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे,पण अध्याप मंजूरी दिली नाही ,पहिले बिलाची रक्कम भरा त्यानंतर विचार केले जाईल ,असे शेतकऱ्यां जवळ उपविभागिय अभिंयता सांगतात.