उपोषण कर्त्यांची मांगण्या मान्य
प्रवीण शेंडे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
मो.9834486558
गोंदिया : -जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया समोर दि.१२ मार्च पासून सूरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर तिन्ही मांगण्या जिल्हाधिकारी श्री प्रजीत नायर यांनी मान्य केली त्यानंतर लगेच जिल्हा परिषद गोंदिया चे अर्थ व बांधकाम सभापती संजयजी टेंभरे यांचे हस्ते उपोषण कर्त्यांस निंबु पाणी पाजुन तिन दिवसा पासुन सूरू असलेल्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
१२ मार्च पासून सूरू असलेल्या आमरण उपोषणाला जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पुढारी, संघटना व पत्रकार इत्यादि मान्यवरांनी भेटी देऊन उपोषण कर्त्यांची मांगणी हि जिल्ह्यातील ग्राहकांच्या संवर्धन व संरक्षणाची असल्याने मांगणीचे समर्थन केले होते.
पहिल्या दिवशी श्री विजयभाऊ रहांगडाले आमदार यांनी मुंबई इथुनच जिल्हाधिकारी यांना मेल वर पत्र पाठवून चर्चा केली होती त्यानंतर
दुसऱ्या दिवशी श्री रेखलालजी टेंभरे संचालक डि.से.को.आ.बैंक गोंदिया यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन लगेच जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी सोबत बोलनी करून न्यायाची मांगणी केली होती,
त्यानंतर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण मंडपाला श्री संजयजी टेंभरे सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद गोंदिया यांनी दु. १.३० वा भेट देऊन लगेच जिल्हाधिकारी यांचे शी बोलनी करून न्यायाची मांगणी करून आजच निर्णय घेण्याची अट घातली असता जिल्हाधिकारी यांनी उपोषण कर्त्यांचे प्रतिनिधीं सोबत दु.३.३० वाजता कार्यालयात बोलावले, त्यानंतर सभापती संजयजी टेंभरे व उपोषण कर्त्यांचे प्रतिनिधीं सोबत जिल्हाधिकारी साहेबांनी अर्धा तास प्रकरणाबाबद सविस्तर चर्चा करून चर्चे अंती उपोषण कर्त्यांचे तिन्ही मांगण्या मान्य करून तसे लेखी पत्र उपोषण मंडपात कार्यालय प्रतिनिधी मार्फत पाठविले.
त्यानंतर सभापती संजय जी टेंभरे यांनी उपोषण मंडपात येऊन उपोषण कर्ते अब्दुल रफीक शेख यांना निंबु पाणी पाजले व उपोषण कर्त्यांने आपले उपोषण समाप्त झाल्याची घोषना केली यावेळी ब-याच प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व पोलिस विभागातील कर्मचारी हजर होते.
त्यानंतर उपोषण कर्त्याने उपस्थित सर्वांचे आभार मानले व उपोषणाच्या तिन्ही दिवसात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणा-या, पत्र व्यवहार करणाऱ्या, न्युज प्रकाशित करणा-या पत्रकार व संपादक इत्यादी सर्वांचे आभार मानुन पोलिस विभागाने सतत रात्रंदिवस दोन पोलिस कर्मचारी सुरक्षे करीता उपलब्ध करून दिल्याबद्दल व पोलिस अधीक्षक कार्यालयातील खुफीया विभागातील अधिकारी आणि सीआयडी विभागातील अधिकारी इत्यादींनी उपोषणा दरम्यान तिन्ही दिवशी विशेष सहकार्य केल्याबद्दल व शासकीय डॉक्टरांच्या चमुने उपोषण स्थळी येऊन तपासणी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले……