मौजा मांडेसर येथील धडाकेबाज सरपंच मा. गुलाबजी सव्वालाखे ” गावाची शान … कार्य केले महान ! पाणी,स्वच्छता,रस्ते, विज, आरोग्य,शिक्षण अशा विविध कामे केल्याने ग्रामवासीयांना सार्थ अभिमान ! भावी सरपंचांनो इकडे लक्ष द्या , स्वावलंबी बना !

मौजा मांडेसर येथील धडाकेबाज सरपंच मा. गुलाबजी सव्वालाखे " गावाची शान ... कार्य केले महान ! पाणी,स्वच्छता,रस्ते, विज, आरोग्य,शिक्षण अशा विविध कामे केल्याने ग्रामवासीयांना सार्थ अभिमान ! भावी सरपंचांनो इकडे लक्ष द्या , स्वावलंबी बना !

मौजा मांडेसर येथील धडाकेबाज सरपंच मा. गुलाबजी सव्वालाखे ” गावाची शान … कार्य केले महान !

पाणी,स्वच्छता,रस्ते, विज, आरोग्य,शिक्षण अशा विविध कामे केल्याने ग्रामवासीयांना सार्थ अभिमान !

भावी सरपंचांनो इकडे लक्ष द्या , स्वावलंबी बना !

मौजा मांडेसर येथील धडाकेबाज सरपंच मा. गुलाबजी सव्वालाखे " गावाची शान ... कार्य केले महान ! पाणी,स्वच्छता,रस्ते, विज, आरोग्य,शिक्षण अशा विविध कामे केल्याने ग्रामवासीयांना सार्थ अभिमान ! भावी सरपंचांनो इकडे लक्ष द्या , स्वावलंबी बना !

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथील धडाकेबाज सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक, व समस्त मांडेसर, रामपूर गावकऱ्यांच्या सहकार्याने सन २०२१-२२ ते सन २०२३-२४ पर्यंत विकासाचे अनेक कामे केलेत.

गावातील धडाकेबाज सरपंच मा. गुलाबजी सव्वालाखे, उपसरपंच मा. रोशनजी लिल्हारे, विकासाचे महामेरू आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक मा. सतीश एच. गित्ते, ग्रा.पं. सदस्य मा. दुर्योधनजी बोरकर, मा. सुधाकरजी मालाधारी, ग्रा.पं. सदस्या सौ. कामुना दमाहे, सौ.शुभांगी अटराहे, सौ. रविना बशिने , सौ. स्वाती लिल्हारे, सौ. कुकवंती सव्वालाखे व गावकऱ्यांच्या सहकार्याने शासनाकडून अनेक कामे खेचून आणून ते पूर्ण करून दाखविले.
ऐन विशित गावचे सरपंच झालेत,काही तरुण आणि तरुणीही काही थेट लोकांमधून निवडून आलेत, कामांचा दांडगा उत्साह आणि गाव बदलायची उर्मी ,या भांडवलावर गावचे सरपंच मा. गुलाबजी सव्वालाखे यांनी विकासाला गावात मूळ धरावं म्हणून गावाच्या विकासासाठी कामाला लागलेत, व शासनाकडून अनेक कामे खेचून आणून पूर्ण करून दाखवलेत. म्हणून संपूर्ण गावकऱ्यांनी कौतूक केले आहे. व मांडेसर – रामपूर वासीयांना सार्थ अभिमान आहे.

राज्यात मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, हजारो भावी सरपंच गावाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, निवडणुका येतात आणि जातात मात्र बहुतांश गावांचा सर्वांगीण विकास पॅनलच्या राजकारणात अडकलेला पाहायला मिळतो. मात्र अशी काही गावे आहेत, ज्यांच्या आदर्श राज्यातल्या इतर ग्रामपंचायतीने घ्यायला हवा, भंडारा जिल्ह्यातील मांडेसर – रामपूर गट ग्रामपंचायतीचे गाव आहे. गावाची लोकसंख्या सध्या ५ हजार आहे. गेल्या तीन वर्षात इथे सात कोटींचा निधी विकासासाठी वापरण्यात आला आहे. पाणी , स्वच्छता ,रस्ते, विज , आरोग्य , शिक्षण अशा अनेक बाबतीत मांडेसर सध्या स्वावलंबी आहे.

मांडेसर ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बनविली. ज्यामधून गावाला वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. शहरातल्या रस्त्यांना लाजवेल असे रस्ते तयार केले, गावात सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. गावात जाणारा मुख्य रस्ता तर शहरातल्या रस्त्यांना लाजवेल अशाच आहे. ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या मालकीचे मालवाहक मिनीडोर आहे.
स्मशान भूमीचा विकास , परमात्मा एक भवन बांधकाम, सार्वजनीक सौचालय , अल्पसंख्यांक सभागृह , सभामंडप, सोलार पम्प , ग्रामपंचायतीची नविन इमारत, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी युवक वाचनालयात अभ्यास पुस्तिका , हे सगळे मांडेसर गावात साकारण्यात आले आहेत. गावाच्या विकासात सरपंचाला रस असला की कसा कायापालट होतो, अशा अनेक सुख-सुविधा याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सत्ता कोणाचीही असो गावाच्या विकासाच्या ध्यानमणी असला की निधी आपोआप गावाकडे वळतो. मांडेसर- रामपूर मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या विभागातून निधी आणण्यात आला आहे. त्यामुळे गावातले लोक ग्रामपंचायतीवर समाधान व्यक्त करत आहेत. सगळ्याच गावात गटा-गटाचं आणि जातीच्या राजकारण असतं. मात्र समतोल साधून गावाला विकासाच्या प्रवाहात आणने सरपंचाला जमले पाहिजे, म्हणून ” भावी सरपंचांनो इकडे लक्ष द्या ” म्हणून मांडेसर सारखं काम तुमच्या हातून घडायला पाहिजे हे याचे ताजे उदाहरण आहे.

*आदर्श गाव बनवण्याची संकल्पना ठेवून केली गावात विकासाची अनेक कामे*

आदर्श गाव ही संकल्पना, आपले गाव आदर्श कसे होईल यासाठी संपूर्ण ग्रा.पं.सदस्य, ग्रामवासी , समाज सेवक यांना हाती घेऊन सरपंच मा. गुलाब सव्वालाखे यांनी पुढाकार घेतला व त्यांनी त्यांच्या कार्यातून ते सिद्ध करून दाखवले. गावातील प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे,पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन,पाण्याची व्यवस्था करणे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योग, यातून ग्राम स्वावलंबन करणे, गावामध्ये राजकारण न करता गावाच्या विकासात भागीदार होणे, हेच मानवाची खरी सेवा आहे असे सरपंच सचिव ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या कार्यातून करून दाखवले.

सन २०२१- २२ ते सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत स्मशानभूमी परिसरात वृक्ष लागवड, सौंदर्यीकरण,जिल्हा परिषद शाळेतील मैदान सपाटीकरण,गावांतर्गत सिमेंट रोड,मोरी बांधकाम, पांधनरस्ते,मातोश्री पांदण रस्ता, रस्त्यांच्या दुतर्फा पेवर ब्लॉक लावणे, भात खचरे, गुरांचा गोठा बांधकाम.
*१५ वित्त आयोगाच्या माध्यमातून*
जिल्हा परिषद शाळा रामपूर येथे सौर ऊर्जा,अंगणवाडी डिजिटल करणे व सौर ऊर्जा लावणे,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ,महिलांसाठी सॅनिटरी पॅड मशीन व सॅनिटरी पॅड डिस्ट्रॉय मशीन लावने,गावामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा एलईडी दिवे लावणे,राणी अवंतीबाई पुतळा परिसर सौंदर्यीकरण,बंदिस्त गटारे बांधकाम,ग्रामपंचायत कार्यालय रेन वॉटर हार्वेस्टिंग, जिल्हा परिषद शाळेत रंग रंगोटी करणे,जिल्हा परिषद शाळा व गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे.
*स्वच्छ भारत मिशन अंतर्गत*
घरोघरी वैयक्तिक शौचालय, ज्ञाने कंपोस्टिंग तयार करणे,जल जीवन मिशन अंतर्गत – पाईपलाईन मग घरगुती नळ कनेक्शन, जिल्हा परिषद शाळेत पाण्याचे व्यवस्थेसाठी नवीन बोरवेल तयार करणे, प्रधानमंत्री आवास योजना , रमाई आवास योजना , वैयक्तिक घरकुले शाळेच्या वर्ग खोली दुरुस्त करणे , मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत शिलाफलक, वृक्ष लागवड , माजी सैनिक स्वागत समारंभ, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत घटस्तरीय पुरस्कार प्राप्त अशा अनेक विकासात भागीदार होणे हेच मानवाची खरी सेवा संकल्प घेऊन गावाचा विकास केले. म्हणून त्या उमेदवारीची एक झलक म्हणून संपूर्ण मांडेसर रामपूर ग्रामवासीयांना कौतुक व सार्थ अभिमान आहे.