आ.किसनराव वानखेडे व नितिन भुतडा यांचे प्रयत्नातून उमरखेड अगारास दहा एसटी बसेस ची उपलब्धी
✍🏻अशोक गायकवाड ✍🏻
उमरखेड तालुका प्रतिनिधी-
मो 9561499931
उमरखेड :- नागपूर-नांदेड, हिंगोली-किनवट या मुख्य मार्गावर तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यातून मोठ्याप्रमाणात प्रवासी भाविक भक्तगण राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड या एसटी अगारातून येजा करीत असतात.
ग्रामिण भागातून देखील दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी नियमित येथील मोटार गाड्यांनी येजा करीत असतात.
वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता येथील अगारास मोटार गाड्यांची मोठ्याप्रमाणात कमतरता भासत होती. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय टाळण्या हेतूने आमदार किसनराव वानखेडे व भाजपा यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी परिवहन मंत्र्यांकडे वारंवार मागणी करून दहा अद्यावत मोटारगाड्या उमरखेड अगारासाठी मंजूर करून घेण्यात यश मिळविले आहे. त्यापैकी पाच मोटारगाड्या या दि.15 मार्च रोजी आगारात दाखल झाल्या आहेत तर उर्वरित पाच गाड्या लवकरच उपलब्ध होणार आसल्याची माहिती नितीन भुतडा यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
आमदार वानखेडे आणि नितीन भुतडा यांच्या एसटी बसेसच्या मागणीस यश प्राप्त झाल्याने अनेक वर्षाची प्रवाश्यांची गैरसोय ही बऱ्यापैकी संपुष्टात येणार असल्याने विविध योजनेतून प्रवास करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी व जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उमरखेड आगारास एसटी बसेस मिळवून दिल्याबद्दल आ.किसनराव वानखेडे व नितिन भुतडा यांच्यावर सर्व स्तरातील प्रवासी बंधू भगिनींनीकडून कौतुकाचा वर्षाव होतांना दिसत आहे.
