हत्तींच्या हल्ल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

हत्तींच्या हल्ल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

तातडीने पंचनामे करून भरपाई देण्यात यावी. मा.खा.डॉ. अशोकजी नेते

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : आरमोरी वनपरिक्षेत्रातील मौजा-इंजेवारी (ता. आरमोरी) येथे मागील चार-पाच दिवसांपासून हत्तींच्या झुंडाने थैमान घालून मक्का व धान पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. या घटनेची माहिती मिळताच मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतपिकांची पाहणी केली.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तींचा कळप सुमारे ३२ असून ते दिवसा जंगलात राहतात व संध्याकाळी ७ वाजता शेतांमध्ये धुडगूस घालतात, परिणामी मक्का आणि धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यासंदर्भात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी वनसंरक्षक अधिकारी रमेशकुमार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या.

हत्तींचा गावात प्रवेश रोखण्यासाठी पश्चिम बंगालमधून विशेष हुलाटीम तैनात करण्यात आली आहे. रात्रभर मशाली पेटवून आणि भाले घेऊन या पथकाचे गस्त घालण्याचे काम सुरू आहे. वनविभागानेही सतत गस्त घालण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली आहे. गावात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

गावकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत जंगलात न जाणे, शक्यतो एकटे न फिरता गटानेच बाहेर पडणे, तसेच हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. “गावकऱ्यांनी चिंता करू नये, मी तुमच्या सोबत आहे,” असे आश्वासन मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी दिले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, क्षेत्र सहाय्यक वाय.के. दोडके, वनरक्षक एन.बी. भर्रे मॅडम, युवा नेते विकास पायदलवार, शरद भोयर, डाकराम कुंबरे,योगाजी कुकडकर,गंगाधर पात्रीकर, सुधाकर बनकर, सुदाराम पात्रीकर, धनपाल बांबोळे, विलास किरनापुरे, खेमराज पात्रीकर, आशिष पात्रीकर, युवराज पात्रीकर,गोपाल वट्टी,
तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधी, शेतकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.