अँस्पायर प्रकल्पतर्गत वर्तणूक व्यवस्थापन प्रणाली भित्तीचित्रांचे उद्घाटन

अँस्पायर प्रकल्पतर्गत वर्तणूक व्यवस्थापन प्रणाली भित्तीचित्रांचे उद्घाटन
✍️मंजुळा म्हात्रे ✍️
नागोठणे शहर प्रतिनिधी
मो:- ९२८४३९३४४८

नागोठणे :- जे.एस.डब्ल्यू. फाउंडेशन आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अँस्पायर प्रकल्पअंतर्गत पेण आणि अलिबाग तालुक्यातील २६ शाळांमध्ये एस्पायर प्रोजेक्ट सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत, १६०० हून अधिक विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये, भाषाशास्त्र आणि अंकगणित यांचे प्रशिक्षण दिले जात आहे . सोबत विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. यात विशेषकरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संदेश देण्यासाठी शाळेच्या भिंतींवर वर्तन व्यवस्थापन प्रणालीचे चित्र काढण्यात आले. त्यात रजिप शाळा शिहू, रजिप शाळा बेणसें, रजिप शाळा मुंढाणी, मध्यमिक हायस्कूल शिहू, पीएनपी माध्यमिक शाळा काचळी कुसुंबळे, सरखेल कान्होजी आंग्रे माध्यमिक हायस्कूल चिखली, टी.टी.पाटिल विद्यामंदिर तीनविरा या शाळांचा समावेश आहे. एक आदर्श, गुणवान, प्रतिभावान विद्यार्थी आणि एक चांगला नागरिक कसा असावा? याची जाणीव हे चित्र पाहिल्यानंतर होते. या भित्तीचित्राच्या उद्घाटन समारंभास मधुकर घासे (पोलीस पाटील), प्रीती उद्धव कुथे (उपसरपंच), सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सह-शिक्षक, शालेय शिक्षण समिती पदाधिकारी, मॅजिक बस कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिंतीवरील रंगकामाच्या उद्घाटनाची सर्व जबाबदारी शाळेच्या बाल पंचायत विद्यार्थी अधिकाऱ्यानी घेतली होती. कार्यक्रमाचे व्यवस्थापन डॉ. प्रगती पाटील (CM), गंगोत्री पाटील(LSE). & मीनल धुमाळ (LSE) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.