मुंबई : प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘मराठी बिग बॉस‘ अवघ्या काही तासांतच टीव्हीवर धडकणार आहे. पण तत्पूर्वी अगदी अखेरपर्यंत बिग बॉसच्या घरात कोणते मराठी सेलिब्रिटी असतील यावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय. यातच एक घोळ झालाय तो ‘सई’ या नावानं. बिग बॉसमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. बिग बॉसमध्ये सई असणार आहे, पण ती ‘ताम्हणकर’ नव्हे!

खुद्द सईनेच ही बाब टि्वट करत लक्षात आणून दिली आणि बिग बॉसच्या घरातलं चक्क एक नाव फोडलं! बिग बॉसमध्ये अभिनेत्री सई लोकुर स्पर्धक म्हणून असणार आहे. आता हे नाव सईनेच सांगितल्यामुळे त्यात दुमत असण्याचं कारण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here