हिंगणघाट येथील डॉ. निर्मेश कोठारी यांना रुग्णालयात मारहाण.

69

हिंगणघाट येथील डॉ. निर्मेश कोठारी यांना रुग्णालयात मारहाण.

हिंगणघाट येथील डॉ. निर्मेश कोठारी यांना रुग्णालयात मारहाण.
हिंगणघाट येथील डॉ. निर्मेश कोठारी यांना रुग्णालयात मारहाण.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी ✒
हिंगणघाट,दि.14 एप्रिल:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टर निर्मेश कोठारी यांना रुग्णाचा नातेवाईकांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामूळे काही वेळ हिंगणघाट शहरांमधील महावीर भवन चौक मध्ये तनावाचे वातावरणात निर्मान झाले होते.

हिंगणघाट येथील एका व्यक्तीचा कोरोना वायरसने मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मारहाण केली होती. यासंदर्भात सदर डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

हिंगणघाट येथील निशानपुरा वार्ड येथील रहवासी एका कोरोना बाधित रुग्णास दुपारच्या सुमारास
डॉ. निर्मेश कोठारी यांचा कोठारी हॉस्पिटल येथे उपचारार्थ आणण्यात आले. डॉक्टर निर्मेश कोठारी यांनी रुग्णाला चेक केल असता तो रुग्ण हा मयत झाल्याचे समजून आले. डॉक्टरांनी त्याचा नातेवाईकांना रुग्ण मयत झाल्याचे सांगितल्याने. संतप्त झालेल्या मृतकाचे नातेवाईकाने डॉ. निर्मेश कोठारी यांना मारहाण केली.

या घटने प्रकरणी आरोपीस अटक करीत योग्य कारवाई न केल्यास खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्णसेवा बंद करण्याची चेतावणी पोलिस प्रशासनास दिली होती. हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे हिंगणघाट शहरांतील सर्व डॉक्टर आणि जनता मोठ्या प्रमाणात हिंगणघाट पोलिस स्टेशनला जमा झाली होती. हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमा द्वारा गुन्हा नोंद करुन पुढील तपास करत आहे.