सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा ब्लेडने गळा कापून स्वतः घराच्या छताला गळफास घेऊन विवाहीतेची आत्महत्या.

49

सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा ब्लेडने गळा कापून स्वतः घराच्या छताला गळफास घेऊन विवाहीतेची आत्महत्या.

सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा ब्लेडने गळा कापून स्वतः घराच्या छताला गळफास घेऊन विवाहीतेची आत्महत्या.
सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा ब्लेडने गळा कापून स्वतः घराच्या छताला गळफास घेऊन विवाहीतेची आत्महत्या.

✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒
यवतमाळ,दि.15 एप्रिल:- यवतमाळ जिल्हातील पुसद तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अनेक लोकाचे काळजाचे ठोके चुकले. पुसद तालुक्याूतील उडदी या गवात राहाणारे पती-पत्नीचा काही करणाने वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर एक मोठ्या घटनेत झाले. 22 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या सव्वा वर्षाच्या पोटच्या गोळ्याची धारदार ब्लेडने गळा चिरुन नंतर स्वतः घराच्या छताला गळफास लाऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दि.13 एप्रिलला पहाटेचा सुमारास उघडकीस आली.

या खळबळजनक घटनेची माहिती उडदी गावच्या पोलिस पाटलांनी पुसद ग्रामीण पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा महिलेने ज्या खोलीत फाशी घेतली त्या खोलीचे दोन्ही दारे आतून बंद होती. घरावरील टिनपत्रे काढून आत प्रवेश केल्यानंतर महिला फास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तर चिमुकले बाळ रक्ताच्या थारोळ्यात अंथरुणावर पडून होते.

मृत महिलेचा पती ज्ञानेश्वर, त्याचे वडील व आई हे घराच्या अंगणात झोपलेले होते. पती-पत्नीचे खटके उडत असल्याने पत्नीला माहेरी पोहचून देण्याचे ठरले असतानाच रात्री ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्याचे ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोतीराम बोडखे यांनी सांगितले. ग्रामीण पोलिसांनी मृत स्वाती ज्ञानेश्वर लोहकरे विरुद्ध आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मृत मुलाचे नाव वीर आहे.

दरम्यान मृतकचे वडील आनंदा नाथबा जाधव (रा. गुळभेली, ता. मोताळा, जि. बुलडाणा) यांनी आपल्या नातवाची जावई ज्ञानेश्वर लोहकरे व सासू-सासऱ्यांनी धारदार ब्लेडने गळा चिरून हत्या केली व मुलीला गळफास देऊन खून करण्यात आला, अशी तक्रार ग्रामीण पोलिसात दाखल केली. मात्र सुरुवातीला ही तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला, असा आरोप आनंदा जाधव व आई आशा जाधव यांनी केल्याने या प्रकरणात संशय निर्माण झाला.