WhatsApp Updates: व्हाट्सअप मध्ये करण्यात आले मोठे बदल, काय आहेत नवीन फीचर्स?

66

काय आहेत व्हाट्सअँप मधील ५ नवीन बदल? ग्रुपच्या ऍडमिनला देण्यात आलाय विशेष अधिकार आणि…

व्हाट्सअँप मध्ये करण्यात आले मोठे बदल, काय आहेत नवीन फीचर्स?

मनोज कांबळे
१५ एप्रिल,मुंबई: आपल्या मित्र परिवाराशी तसेच व्यवसायिकांना आपल्या ग्राहकांशी सहज आणि सोप्प्या पद्धतीने संपर्क साधण्यासाठी आज जगभरात व्हाट्सअँपचा वापर होतो. भारतामध्ये तब्बल ३९ कोटी व्हाट्सअँप युझर्स असल्याचा अंदाज आहे. या व्हाट्सअँपमध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत. मेटा या मालकी हक्क असलेल्या कंपनीद्वारे हे बदल जाहीर करून याद्वारे यूझर्सना नवीन फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

काय आहेत व्हाट्सअँप मधील ५ नवीन बदल?
व्हाट्सअँप मध्ये मिळणार इमोजीची बटण. एखाद्या मेसेजला त्वरित उत्तर देण्यासाठी सहा इमोजींची बटण उपलब्ध होणार असून भविष्यात हि संख्या विविध इमोजींची बटन्स देऊन वाढवण्यात येणार आहेत.

व्हाट्सअँप वरून तुम्हाला करता येणार आता २ जीबी पर्यंतचा डेटा शेअर. याअगोदर व्हाट्सअँप वरून माहिती डेटा फाईल शेअर करण्याची लिमिट हि १०० एमबी होती. आता ती वाढवून २ जीबी करण्यात आली आहे. त्यामुळे युझर्सना हाय डेफिनेशन व्हिडिओ, फोटो, प्रोजेक्ट्स यांची देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे.

व्हाट्सअँप वरून करता येणार आता ३२ जणांना एकाच वेळी ग्रुप व्हॉइस कॉल. व्हाट्सअँपवरून सध्याचा घडीला व्यावसायीक कॉल्स, बिझनेस संदर्भात मिटींग्स यांचे प्रमाण वाढत असल्याने व्हाट्सअँपतर्फे पहिली ८ जणांची लिमिट रद्द करण्यात आली आहे.

ग्रुप मधील वादग्रस्त मेसेज किंवा चुकीची माहिती पसरवणारे चॅट्स आता ग्रुपच्या ऍडमीनला डिलीट करता येणार आहेत. हे दिलेले चॅट त्यानंतर ग्रुपमधील कोणतीही व्यक्ती पाहू शकणार नाही.

 

या ट्रेंडिंग बातम्या वाचल्यात का?

 

व्हाट्सअँप वर आता तयार करता येणार कम्युनिटीझ. हा व्हाट्सअँप मधील एक मोठा बदल आहे. याद्वारे शाळा, एनजिओ, क्लब,हॉटेल्स यांसारख्या संस्थासाठीच्या सूचना, नवीन नियमावली एकाच वेळी संबंधित कम्युनिटीपर्यंत एकाच वेळी पाठवता येणार आहेत. यांमुळे महत्त्वाचे संदेश कमी वेळात योग्य लोकांपर्यंत पोहचणे जलद आणि सहज होणार आहे.

व्हाट्सअँप मधील हे बदल येत्या काही दिवसामध्ये उपलब्ध होणार असून, ते कार्यान्वयीत झाल्यानंतर युझर्सनी अँप्लिकेशन उपडेट करून वापरावे असे, व्हाट्सअँप कडून आवाहन करण्यात आले आहे.