महाडमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष
महामानवाची १३१ वी जयंती उत्साहात साजरी
✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०
महाड : -महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज महाड
क्रांतीभूमीत उत्साहात साजरी झाली. मध्यरात्री पासूनच महाड
मधील चवदारतळे आणि क्रांतीस्थंभ येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी,
सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज संपूर्ण विश्वात
जल्लोषात साजरी होत असताना महाड क्रांतीभूमीत देखील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.
कोरोनाचे सावट संपल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज महाडमध्ये जल्लोषात आणि दिमाखात साजरी झाली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड शहरामधील चवदारतळे आणि क्रांतीस्थंभ याठिकाणी महामानवास अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी एकच गर्दी केली होती. विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक, संघटनाच्या प्रतिनिधींनी आज चवदारतळे येथे महामानवास वंदन केले. यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, महाडच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा स्नेहल जगताप, भाजपचे उपजिल्हाप्रमुख बिपीन म्हामुणकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, निलेश तळवटकर, रिपब्लिकन पार्टीचे महाड तालुकाध्यक्ष मोहन खांबे, केशव हाटे, रिपब्लिकन पार्टीचे शहर अध्यक्ष प्रभाकर खांबे, बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष अशोक जाधव, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय सेलचे अनंत कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी रोडगे, तहसीलदार सुरेश काशीद, महाड पंचायत
समितीचे गट विकास अधिकारी रावसाहेब पोळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे माजी अध्यक्ष अरुण कासारे, आदींनी चवदारतळे येथे महामानवास
अभिवादन केले.
महाड शहरातील विविध ठिकाणच्या भीमसैनिकांनी मध्यरात्री क्रांतीस्थंभ आणि चवदारतळे येथे येवून महामानवास अभिवादन केले. संपूर्ण राज्यातून विविध ठिकाणाहून आलेल्या भीमज्योतींचे स्वागत यावेळी चवदारतळे येथे करण्यात आले. महाड शहरातील डॉ.बाबसाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड मधील न्यायलय, तसेच आदि शासकीय कार्यालयातून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती मार्फत सालाबादप्रमाणे काढण्यात येणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महाड तालुक्यातील नडगाव, कोळोसे, कोल, कोथेरी, सव, कुंबळे, जुई, आदी ठिकाणचे आखाडे सहभागी झाले होते. हि भव्य मिरवणूक महाड शहरातून काढण्यात आली. यामुळे संपूर्ण शहर जय भीम च्या जयघोषाने दणाणून गेले.