आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत किंजळोली मोहल्ला बु. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):-महाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भरत गोगावले हे करित असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवत महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी दि.१४ एप्रिल 2022 रोजी आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपले कार्यसम्राट आमदार ज्या पद्धतीने विकासकामे करित आहेत त्यांच्या कार्यपद्धती वरती विश्वास ठेवत आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश केला असून यापुढे पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या पक्षप्रवेश समारंभावेळी महाड तालुक्यातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, विभाग प्रमुख,आणि विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते