माणगांवमध्ये बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क बामसेफ, माणगांव तालुका महासचिव अनिकेत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व छाया प्रवीण नेतकर यांच्या उपस्थिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची १३१ वी जयंती उत्सहात पार
सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी रायगड ८०८००९२३०१
माणगांव :-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची १३१ वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा जयजयकार माणगांव मधील क्राती नगर येते दुमदूमला होता तसेच भीम अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती उत्सहात पार पाडली यावेळी प्रमुख पाहुणे या जयंती ला माणगांव राष्ट्रवादी प्रभाग २ च्या नगर सेविका सुविधा खैरे समाजसेवक संतोष खैरे नगरसेवक दिलीप (बबडी शेठ ) जाधव, शेकाप चे युवासेना निलेश थोरे पाटील, रचना निलेश थोरे पाटील, युवा राष्ट्रवादी कार्यकर्ते सुमित काळे, आयु प्रभाकर मसुरे माणगांव पत्रकार संघ सल्लागार ,रायगड जिल्हा पत्रकार सेवा संघ माणगांव तालुका कार्यध्यक्ष सचिन पवार,स्वराज्य सह्याद्री ग्रुप चे माणगांव शहर प्रमुख प्रदीप पवार,आयु दीपक मोरे, आयु कांबळे सर, प्रवीण बागवे, अरुणा म्हात्रे, सचिन म्हात्रे, संजय आरसे, खेमणार सर, खेमणार मॅडम, घोडे सर, वर्षा घोडे, सुमन कापरे, संगीता ताई त्याच प्रमाणे उपस्थित मान्यवर व किलबिल परिवार याच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाचे आयोजक आयु प्रवीण नाना नेतकर आयु छाया प्रवीण नेतकर, आयु अनिकेत सिकंदर कांबळे, अस्मिता कांबळे, संजना कदन, प्रमुख वक्ते मा. मिलिंद साळवी, असंघटित कामगार शाखा, वसंत जाधव लहुजी क्राती मोर्चा याच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रम पार पडले यावेळी माणगांव क्रातीनगर वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या निमित्ताने उपस्थित मान्य वरानी बाबा साहेबाच्या प्रतिमेस सलामी देऊन बुद्ध वंदना करण्यात आली.त्याच प्रमाणे स्वरूपा अनिकेत कांबळे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जीवनावर गीत गाऊन संदेश दिला सूत्रसंचालन दीपक मोरे, किरण मोरे यांनी उत्तम रित्या केले दरम्यान कोरोना आणि लोकडाऊन मुळे दोन वर्ष आंबेडकर जयंती मोठया प्रमाणात साजरी केली नव्हती परंतु यंदा निर्बंध हटल्याने मोठया उत्सहात आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.