बेळगाव-नागपूर विमानसेवेस उद्यापासून प्रारंभ

बेळगाव-नागपूर विमानसेवेस उद्यापासून प्रारंभ

बेळगाव-नागपूर विमानसेवेस उद्यापासून प्रारंभ

✍ त्रिशा राऊत✍
नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.(9096817953)

नागपूर : उडान-३ अंतर्गत बेळगावसाठी मंजूर झालेल्या बेळगाव-नागपूर विमानसेवेस उद्यापासून (शनिवार ता.१६ एप्रिल) प्रारंभ हाेत आहे.ही सेवा स्टार एअरच्या माध्यमातून देण्यात असून अवघ्या दीड तासांत सांबरा विमानतळावरुन प्रवाशांना राज्याच्या उपराजधानीत पोहोचता येणार आहे.सन २०१९ मध्ये बेळगावचा समावेश उडान याेजनेत झाला. त्यानंतर सन २०२० मध्ये बेळगाव-नागपूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला हाेता. दरम्यानच्या काळात काेविड १९ चा प्रादुर्भाव वाढला आणि देश लॉकडाऊनच्या छायेत गेला. आता काेविड १९ चे प्रमाण कमी झाल्याने स्टार एअरने विमानसेवा सुरू करण्याची नुकतीच घाेषणा केली आहे.प्राथमिक माहितीनूसार ही सेवा आठवडय़ातून दोन दिवस असेल. या विमानसेवेचा बेळगाव बराेबर काेल्हापूर , सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना फायदेशिर ठरेल असे सांगितलं जात आहे.