रयत शिक्षण संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कतृत्वान महिला चा सत्कार
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016
एटापल्ली : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की महात्मा जोतीराव फूले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महा मानवाच्या जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रीय बंधुता परीषद, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कतृत्वान महिला चा सत्कार समारंभ आज दिनांक 15/04/2022 ला एस एम जोशी सभागृह पूणे येथे पार पडला या मध्ये सौ. दुशिला नेताजी मेश्राम, (दरेकार) याना त्यागमू्र्ती रमाई आंबेडकर पुरस्काराने गौरवण्यात आले. याबद्दल प्रा डॉ. विश्वनाथ दरेकार, प्रा. दुर्गे, तसेच अनेक मित्र मंडळी नी त्यांचे अभिनंदन केले