सोयगाव: सोयगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध पक्ष संघटनेतर्फे अभिवादन

81

सोयगाव: सोयगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध पक्ष संघटनेतर्फे अभिवादन

 

माधवराव कऱ्हाळे

सोयगाव प्रतिनिधी 

सोयगाव शहर व परिसरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त शासकीय निमशासकीय कार्यालयासह स्थानिक स्वराज्य संस्था व विविध पक्ष-संघटना कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शुक्रवारी (दी.१४) अभिवादन करण्यात आले.तसेच शहरासह गावोगावी डॉ. आंबेडकर प्रतेमेची मिरवणूक काढून जयजयकार करण्यात आला.

सोयगाव येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी सकाळी भारतीय बौद्ध महासभा व नवतरुण बौद्ध मित्र मंडळाच्या वतीने सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली.बौद्ध श्रामनेर विठ्ठल नावगीरे व लहान बालिका प्रतीक्षा पगारे व प्रणवी पगारे यांनी पाली भाषेत बौद्ध वंदना व भीमस्तुती घेतली. 

तदनंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष व समिती तसेच नगर पंचायत अध्यक्ष, नगरसेवक , सपोनि अनमोल केदार,यांच्यासह विविध पक्ष -संघटना व प्रतिष्ठित नागरिकांनी पुष्पहार घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

 

सायंकाळी मातोश्री रमाई आंबेडकर कॉलोनी आमखेडा येथून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोल ताश्याच्या व बॅंडच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक संत ज्ञानेश्वर कॉलोनी, एस टी डेपो, शिवाजी नगर, तहसील कार्यालय, रामजीनगर, एस.टी बसस्थानक, छत्रपती शिवाजी नगर मार्गे डॉ आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकती पुतळ्यास पुष्पहार घालून विसर्जित करण्यात आली.

तसेच विश्वरत्न डॉ.आंबेडकर नगर सोयगाव येथून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोल ताश्याच्या व बॅंडच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.ही भवानीपुरा, भीमवाडी, वाल्मिकपुरा, वाल्मिक चौक,नारळीबाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, व याच मार्गे पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आली.

मिरवणुकीत ढोल ताश्याच्या गजरावर अबाल वृध्द, स्रिया व पुरुष थिरकत डॉ बाबासाहेब आंबेकरांचा जयजयकार करत होती.

 

या मिरवणुकीत रवींद्र काळे, संदीप चौधरी, यांच्यासह नदीपक नवगिरे,योगेश पगारे,राहुल श्रीखंडे, प्रमोद परदेशी, अक्षय हिवाळे,अतुल पगारे, नितीन पगारे, सुमित वानखेडे, भारत पगारे, कैलास काळे,राहुल पगारे, रवींद्र पगारे, चंद्रकांत पगारे,मंगेश साळवे, विजय पगारे, नितीन साळवे, हिम्मत पगारे,भगवान पगारे, भगवान वानखेडे, संदीप पगारे,बबलू वानखेडे, सुनील पगारे, रमेश साळवे, गणेश पगारे, सचिन नवगिरे,अक्षय औरंगे, अजय नेरपगारे, कलीम पठाण, दशरथ खिरडकर, उदय रावळकर, अक्षय पगारे, प्रविण पगारे,कैलास काळे, शेख सलीम,बंटी पगारे, मयूर पगारे, सलमान शिक्कलकर,दत्तात्रय काटोले, राजू दुतोंडे, दत्तू काटोले, रामा एलिस,विश्वजित तायडे, सागर श्रीखंडे, सुमेध गायकवाड,दिलीप निकम,गणेश पगारे,अंकुश पगारे, निकम पेंटर, हिम्मत पगारे,गौतम साळवे, भास्कर पगारे, भास्कर श्रीखंडे, मधुकर पगारे, तसेच महिला मंडळाच्या वैशाली पगारे, ज्योतीताई कांबळे, ज्योतीबाई ओव्हाळ, सुरेखा वाघ, करुणा निकम, सुपडाबाई साबळे, श्रीखंडेबाई, सुनीता पगारे,कमलाबाई पगारे, लिलाबाई पगारे, अल्काबाई पगारे, वंदनांबाई पगारे, लक्ष्मीबाई पगारे, दगडाबाई पगारे, सुनीताबाई पगारे, छायाबाई पगारे, अरुणाबाई श्रीखंडे, अरुणाबाई निकम, जाधव बाई, यांच्यासह आमखेडा, रमाबाई कॉलोनी, नारळीबाग, भीमवाडी, बाबुराव काळे नगर,आदी भागातील भिमअनुयायी सहभागी झाले होते,

शासकीय- निमशासकीय कार्यलयात अभिवादन :-

 सोयगाव येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन कार्यालय,नगर पंचायत कार्यालय, तालुका ,खरेदी विक्री संघ, वनक्षेत्रपाल कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय, भूमीअभिलेख कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय,जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव, केंद्रीय प्राथमिक शाळा, संत ज्ञानेश्वर कॉलेज, कला विंज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नेशनल मराठी विद्यालय,ग्राम पंचायत कांकराळा, ग्राम पंचायत कार्यालय गलवाडा, ग्राम पंचायत कार्यालय आमखेडा, ग्राम पंचायत कार्यालय माळेगाव, ग्राम पंचायत कार्यालय जरंडी, ग्रामपंचायत कार्यालय बहुलखेडा, ग्राम पंचायत कार्यालय घोसला, ग्राम पंचायत कार्यालय नांदगाव तांडा, ग्राम पंचायत कार्यालय तिडका, व ग्राम पंचायत कार्यालय बनोटी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कार्यालय प्रमुखांसह सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांनी पुष्पहार घालण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोयगाव पोलीस स्टेशनतर्फे सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार तसेच नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.