भारताच्या निर्यातीत वाढ
प्रफुल मदनकर
कृषी उद्योजक
भारताची निर्यात ७७०.१८ अब्ज डॉलरची ( २०२२-२३ मध्ये १३.९% नी वाढ) कुठल्याही देशाला जर आर्थिक महासत्ता करायची असेल तर त्या देशाच्या ‘ निर्यातीला चालना देणे गरजेचे असते.म्हणून भारत देशाला इतर देशाच्या तुलनेत निर्यातीवर अधिक भर द्यावा लागेल.करिता भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तूमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिकल वस्तू,पेट्रोलियम उत्पादने,तांदूळ ,कॉफी,फळे आणि भाजीपाला, फार्मा,इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
तसेच कृषिमाल प्रक्रिया उद्योगांना चालना देवून कृषी उत्पादने परकीय देशांमध्ये अधिकाधिक निर्यात करणे सुध्दा तेवढेच महत्वाचे आहे.करिता शेतकऱ्यांनी ‘ प्राकृतिक शेती ‘ कडे वळूया त्याची योग्य प्रक्रिया केलेले उत्पादने निर्माण करण्यात कार्य करणे आवश्यक आहे. शेत मालाची प्रतवारी करून विक्री करण्यास प्रोत्साहन देणे व गट शेतीतून कृषी मालाला योग्य दर कसे मिळतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
.यास प्रत्येकानी आपली जबाबदारी सांभाळून काम करणे आणि इतरांना यास निर्यातीत प्रोत्साहन देत शेतकऱ्याची समृध्दी कशी होईल हाच ध्यास जोपासणे अधिक महत्वाचे आहे.