माणगांव येथील श्री. दत्तयात्रेमध्ये हरवलेल्या ३ वर्षीय बालकाला पोलिसांनी केले पालकांच्या हवाली
✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव मध्ये काल झालेल्या यात्रेत कुमार कार्तिक अंकुश काटकर वय वर्ष ०३ रा. लोणशी आदिवासी वाडी हा मुलगा माणगाव यात्रेत हरवला होता.या घटनेची खबर माणगांव पोलिसांना समजतास माणगांव पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक मोहिते, पो. हवालदार प्रशांत पाटील, म पो, शि,दिपाली मोरे व म. पो. शि.अश्विनी मदने यांनी त्या मुलाच्या आई वडिलांचा तपास करीत त्यास त्याची आई सुजाता अंकुश काटकर यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे.माणगांव तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आणि शेवटून दुसरी जत्रा माणगांव शहरातील श्री. दत्ताची जत्रा म्हणून ओळखले जाते. भरगच्च विविध वस्तूची दुकानें व आकाश पाळणे आणि देवाच्या जतरकाट्या, पालखी अशी रोमहर्षक माणगांवची जत्रा असते यावेळी बंदोबस्तात तैनात असणाऱ्या माणगांव पोलिसांची एक अशी जबरदस्त कामगिरी बजावली आहे.
दि.१४ एप्रिलच्या रात्री माणगांव जत्रेमध्ये हजारोच्या संख्येने जनसमुदाय फिरत होता यांच वेळी रात्री ११.३0 वाजण्याच्या सुमारास एक ३ वर्षीय लहान मुलगा जत्रेत वावरत असताना दिसून आल्याने त्याला वाहतूक पोलीस चौकी येथे आणन्यात आले व काही वेळाने पोलिसांनी सूत्रे फिरविल्यानंतर पोलीस चौकी जवळ बसलेला चिमुकला मुलगा आईला बघून कवटलला त्यानंतर सदरची परिस्थिती हातळणारे माणगांव पोलीस ठाण्याचे सपोनी मोहिते, पोहवा 786 प्रशांत पाटील, मपोशी/575 दिपाली मोरे, मपोशी/635 अश्विनी मदने यांनी केली आहे.या कामगिरी बद्दल माणगांव पोलिसाचे कौतुक सगळीकडे होत आहे.