भारतरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी माणगाव तालुक्यातील चांदोरे बौद्धवाडी येथे आदर्श बौद्ध विकास मंडळ, माता रमाई महिला मंडळ, नवतरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जगामध्ये असा एक महामानव रुपी कोहिनूर आहे की ज्याची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. अश्या या महामानवाला कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी आदर्श चांदोरे बौद्धवाडीतील उपासक, उपसिका ग्रामपंचायत चांदोरे व न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे येथे सालाबाद प्रमाणे घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साक्षी शिंदे ताई यांच्या शुभ हस्ते अर्पण करण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच नथुराम चाचले साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,अंगणवाडी सेविका ताई लता मोर्बेकर, जाधव ताई, शिरगावकर ताई,आशाबाई पूजा चांदोरकर, पंचायत समिती माजी सभापती सुजित शिंदे, राजाराम इंदुलकर, बौद्ध वाडीतील सर्वच लहान थोर, चांदोरे गाव, रोहिदासवाडी , आदिवासीवाडी ,रानवडे, दोन्ही नळेफोडी, गौलवाडी तसेच पंचक्रोशीतील बहुसंख्य पुरुष, महीलाभगिनी तसेच नवतरुण या महामानवाच्या जयंतीस उपस्थीत होते.
न्यू इंग्लिश स्कूल चांदोरे येथे देखील डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले, न्यू इंग्लिश स्कूल चांदोरेचे शिक्षक जंगम सर व सावंत सर यांनी प्रथम सर्व उपस्थितांचे स्वागत केले, जंगम सरांनी सर्व महिला, पुरुष, व विद्यार्थी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनमोल असे विचार मांडले ,एवढेच नाही तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केले, हे उपस्थितांच्या लक्षात आणून संबोधित केले.
ग्रुप ग्रामपंचायत येथे घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रार्थमिक शाळेमध्ये जावून शाळेमध्ये असणाऱ्या डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आले,
बौद्धवाडी येथील बुद्ध विहारात आल्यावर सर्व उपासक, उपसिका यांनी बुद्ध वंदना व पंचशीला घेवून बाबासाहेबांच्या जीवनावर दीपक तांबे, सखाराम मोहिते, बाळाराम तांबे, दिपक तांबे यांनी जमलेल्या लोकांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखाराम मोहिते, यांनी केले,जनार्धन मुरुडकर, कृष्णा गोरेगावकर,गोवेले येथून माजी शाखा अध्यक्ष रामदास मोरे, राहुल तांबे, पाभरे येथील बौद्धचारी राजन मोहिते रोहिदास विकास फाऊंडेशन माणगाव तालुका अध्यक्ष मयूर चांदोरकर व आदर्श बौद्ध विकास मंडळ चांदोरे सर्व पदाधिकारी व सदस्य नवतरुण मित्र मंडळ पदाधिकारी व सदस्य , माता रमाई महिला मंडळ पदाधिकारी व सदस्य व संत रोहिदास वाडीतील सर्व नागरिक उपस्थित होते.