तिरोडा मे गुंजा जय भीम का नारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महा रॅली चे आयोजन. हजारो भीम सैनिकांनी घेतला सहभाग

तिरोडा मे गुंजा जय भीम का नारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महा रॅली चे आयोजन. हजारो भीम सैनिकांनी घेतला सहभाग

तिरोडा मे गुंजा जय भीम का नारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महा रॅली चे आयोजन.
हजारो भीम सैनिकांनी घेतला सहभाग

तिरोडा मे गुंजा जय भीम का नारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महा रॅली चे आयोजन. हजारो भीम सैनिकांनी घेतला सहभाग

प्रवीण शेंडे
प्रतिनिधी गोंदिया जिल्हा
मो.9834486558

गोंदिया – तिरोडा.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तिरोडा द्वारा दरवर्षी या वर्षी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्सवात मनवण्यात आली त्यात शहरातील बौद्ध बांधवानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, युवकांनी आणि महिलांनी DJ च्या तालावर नाचत आणि जय भीम च्या घोषणा देत संपूर्ण शहर आंबेडकर मय करून टाकले होते, जिकडे पहिले तिकडे भीमाचे लेकर पांढरे शुभ्र वस्त्र घालून बाबाच्या उत्सवात सामील होते. सकाळ पासूनच विहारात बाबासाहेबान चे अनुयायाचे विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव विश्व् रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून मोमंबत्ती लावून वंदना करीत होते. रॅली ची सुरवात महाप्रज्ञा बौद्ध विहार आंबेडकर वॉर्ड इथून सुरवात करण्यात आली, संपूर्ण शहरात अवंती चौक, संत जगनाडे चौक, स्नेहल सिनेमा, कहार मोहल्ला, जुनी वस्ती, मोहनलाल कंपनी चौक असा संपूर्ण शहराचा भ्रमण करून उत्तर बुनयादी शाळेच्या मैदानात रॅली चे समापन करण्यात आले, समापणाच्या वेळेवर गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड उपस्तित होते या प्रसंगी भोजन दानाचे कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आले होते तसेच संपूर्ण शहरात विविधी ठिकाणी स्टॉल लावण्यात आले, त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष आणि समाजातील प्रत्येक वर्गातील धर्मातील स्टॉल पाहायला मिळाले. भंडारा गोंदिया लोकसभाचे उमेदवार डॉ. प्रदीप यादोराव पडोळे यांनी विहारात येऊन तथागत भगवान गौतन बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून विजयाची कामना केली, या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष पवन मोरे, तालुका अध्यक्ष रमेश टेमभरे, ओम पटले, जोशना शेंडे, पूजा उरकुडे, रश्मी गौर, वनिता ठाकरे, सौरभ चौहान, आणि काँग्रेस से कार्यकर्ते उपस्तित होते.
या संपूर्ण रॅली चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तिरोडा चे अध्यक्ष विजय बनसोड, उपाध्यक्ष राजेश गुनेरिया, सचिव जितेंद्र डहाटे, सहसचिव प्रवीण शेंडे, सदस्य उमेश मेश्राम, अमरदीप वाहने, विनोद चौहान, तसेच महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती अध्यक्ष अतुल गजभिये, आणि सर्व पदाधिकारी यांचा सुद्धा सहभाग होता.