राजीव नगर वसाहत येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

राजीव नगर वसाहत येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

राजीव नगर वसाहत येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

राजीव नगर वसाहत येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक:- राजीव नगर वसाहत येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते . महिला पुरुष भीम अनुयायी मोठ्या संख्येने पांढरे वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते . राजगृह बुद्ध विहार येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन राजीव नगर वसाहत येथून भव्य मिरवणूकीस सुरुवात झाली.

राजीव नगर रोड, भगवती चौक, कानिफनाथ चौक, जुने इंदिरा नगर पोलीस स्टेशन, राजीव नगर वसाहत येथील राजगृह बुद्ध विहार मध्ये सामूहिक बुद्ध वंदना घेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली . जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश तुपसुंदर, शत्रुघन ढोले, सुभाष उंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवमणूक काढण्यात आली होती . मिरवणुकीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला चित्ररथ सामील होता . यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती अमोल जाधव, डॉ. विशाल जाधव, सागर देशमुख, राजेश भोसले सहभागी झाले होते . इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जयंती शांततेत पार पाडावी यासाठी योग्य ती मेहनत घेतली.

जयंतीत माजी नगरसेवक सतीश सोनवणे व संत रोहिदास युवा मंच नाशिक यांच्या वतीने मिरवणुकीतील सहभागी झालेल्यांसाठी थंड पेयाची व्यवस्था केली होती . डिजेच्या भीम गीतांवर लहान मूल-मुली, अबाल वृद्ध, भीम अनुयायांनी ठेका धरला. मधुकर गायकवाड, महादेव लोखंडे, सुधाकर भवाळे, रावसाहेब मकासरे, उत्तम पंडित, माणिक बनसोडे, उत्तम लोखंडे, अर्जुन जाधव, भास्कर सोनवणे, सुदर्शन गवई यांनी मिरवणुकी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले .