खेडी (खुर्द) या गावातील विहिरीत बैल पडून गंभीर जखमी.

53

खेडी (खुर्द) या गावातील विहिरीत बैल पडून गंभीर जखमी.

खेडी (खुर्द) या गावातील विहिरीत बैल पडून गंभीर जखमी.
खेडी (खुर्द) या गावातील विहिरीत बैल पडून गंभीर जखमी.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी

नरखेड:- तालुकाअंतर्गत येत असलेल्या खेडी (खुर्द) या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळ आज तेथील शेतकरी गोपाळ नारायण राऊत यांनी विहिरी जवळ बैल बांधले असता दोंन्ही बैलांमध्ये टक्कर झाल्यामुळे त्या मधला एक बैल 70 वर्षी जुनी विहीर असणाऱ्या दगडाने बाधलेल्या विहिरीत विहिरीवर लोखंडी जाळी नसल्यामुळे व विहिरीला वरील काठ नसल्यामुळे बैल विहिरीत पडल्याची घटना आज घडली. विहिरीत बैल पडल्याचे गावातील नागरिकांना कळताच गावातील नागरिक यांनी. घटनास्थळी जाऊन त्या बैलाला दोराने विहिरीतून बाहेर काडण्यात यश मिळाल्याने व सुदेवाने त्या विहिरीत पाणी कमी असल्यामळे त्या बैलाचे प्राण वाचले.

खेडी ( खुर्द ) येथील वार्ड क्र १ मधील ग्रा. प. सदस्य सविता नवरंग तसेच, जोष्णा गणवीर, चंदू धूर्वे यांनी पहिल्याच ग्रा. प. मासिक सभेत ही विहीर 70 वर्षी जुनी असून त्या विहिरीचे काठ हे जमीन दोस्त असल्यामुळे व ही विहीर पाण्याच्या टाकी जवळ असल्यामुळे या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते व लहान मुले देखील येथे खेळत असतात त्यामुळे या विहिरी वर लोखंडी जाळी, बसविण्यात यावी
जेणे करून येथे कोणतीही जीवित हानी होऊ नये असे मासिक सभेत ठराव घेण्यात यावे असे ग्रा. प. सदस्य यांनी सविता नवरंग यांनी सागितले होते परंतु 3 महिने होऊन सुद्धा या विहिरी वर ग्रा. प. प्रशासनाने लोखंडी जाळी बसविली नसल्यामुळे आज या विहिरीत बैल पडल्याची घटना घडली सुदैवाने या बैलाचे प्राण वाचले या नंतर अशी घटना घडू नये करिता ग्रा. प. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रीत करून विहिरी वर तात्काळ लोखंडी जाळी बसविण्यात यावी अशी मागणी ग्रा. प. सदस सविता नवरंग, जोसना गणवीर ,चंदू धुर्वे व गावातील अनेक नागरीकांनी केली आहे.