देसाईगंजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कोविड केअर सेंटर: आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण.
✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
देसाईगंज : – कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता उपलब्ध सोयी सुविधा अपु-या पडु लागल्याने देसाईगंजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 100 व्हेंटिलेटर व ऑक्सिजन युक्त बेड उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला दि.28 एप्रिल 2021 पासून सुरुवात करण्यात येऊन आजमितीस येथील कोवीड केअर सेंटरचे काम जवळपास पूर्णत्वास गेल्याने रुग्णांची होत असलेली होरपळ पाहु जाता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आज दि.15 मे रोजी रुग्णांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले आहे.
अवघ्या काहीच दिवसात तयार करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असुन यावेळी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, भाजपा जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे,नगराध्यक्षा शालु दंडवते,उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा,तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष व तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार संतोष महले,प्रभारी गट विकास अधिकारी निर्मला कुचिक,मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभिषेक कुंमरे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. अविनाश मिसार,संतोष श्यामदासानी, लक्ष्मण रामाणी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अती तत्काळ सेवा म्हणून 50 बेडची व्यवस्था करण्यात आली असुन पैकी दहा बेड ऑक्सिजन युक्त तयार करण्यात आले आहेत.तथापि जोखमीरच्या रुग्णांना येथील कोवीड केअर सेंटर मध्ये हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असुन युद्धस्तरावर संपुर्ण बेड लवकरच व्हेंटिलेटर व ऑक्सिजन युक्त करण्याचे काम सुरु असुन तज्ञ डाॅक्टरही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडणारा अतिरीक्त ताण कमी होऊन जोखमीच्या रुग्णांना तत्काळ संदर्भ सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून आमदार कृष्णा गजबे यांनी येथील रुग्णांसाठी सॅनिटाईजर मशिन उपलब्ध करून दिली असुन आणखीही अत्यावश्यक संदर्भिय सेवा उपलब्ध करून देण्यावर जातीने लक्ष ठेऊन असुन तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करुन कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकामी यंञणा अधिकाधिक गतीमाक करण्यात येत असल्याने तालुक्यातील मृत्यू दर आटोक्यात आणण्यात यश येणार असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.