वांद्रा येथील बॅण्डस्टॅण्ड जवळ तीन मित्रांनी मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि15.मे:- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मैत्रिणीवर तिन नराधम मित्राने सामुहीक बलात्कार केल्याने मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला आहे.
सध्या लॉकडाउन आणि संचारबंदी असल्यामुळे सर्वीकडे मशान शांतता आहे. याचाच फायदा घेऊन वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुण हे पीडितेच्या ओळखीचे असून चांगले मित्र आहेत.
मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरात तीन मित्रांनी संगनमत करून आपल्याच मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. ही धक्कादायक घटना बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टारच्या घरासमोर घडल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित आरोपी हे 19 ते 21 या वयोगटातील असून वांद्रे पोलिसांनी तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तीनही आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
गोवंडी परिसरात राहणाऱ्या तरुणीला तीन मित्रांनी बॅण्डस्टॅण्ड येथे आणले. हे चौघे दोन मोटारसायकलवरून आले. मुलीला बॅण्डस्टॅण्ड येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या खडकांत नेऊन सामूहिक बलात्कार केला. नंतर तिला तिच्या घरी नेऊन सोडले. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या बहिणीने विचारपूस केली तेव्हा पीडित तरुणीने आपबिती सांगितली. त्यांनतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादंवि 376 (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने नंतर तिथे ट्रान्सफर करण्यात आला. तीन आरोपी आणि पीडित एकमेकांना चांगलं ओळखतात. मैत्रिचा फायदा घेत आरोपींनी हे धक्कादायक कृत्य केलं आहे.